
कोल्हापूरच्या राजारामपुरीमध्ये नवश्या मंदिर परिसरात एका घराला सकाळी आग लागली. तेव्हा त्या आगीत सिंलेंडरचा स्फोट झाला. पण अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण आणले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण आर्थिक नुकसान खूप मोठे झाले आहे.
Last Updated: Jan 06, 2026, 14:49 ISTभाजपचे वन मंत्री गणेश नाईक यांनी मुलाखतींध्ये म्हटलं," येणारा काळ माफ करणार नाही. जे गमजा मारतात ना , आम्ही ..आम्ही, बहिणी.. बहिणी, बहिणी काय एकट्याच्या आहेत का? देवेंद्र फडणवीसांच्या आहेत, अजित पवारांच्या आहेत. परिस्थितीनुसार करावं लागतं. पण तुम्ही एवढे उन्मत्त बनाल हे कोणाला माहिती होतं."
Last Updated: Jan 09, 2026, 15:38 ISTअमरावती : विदर्भ हा झणझणीत पदार्थासाठी प्रसिद्ध आहे. वर्षभर सुद्धा विदर्भात प्रत्येक सणावाराला काही तरी विशेष पदार्थ किंवा एखादी विशेष थाळी बनवली जाते. सध्या पौष महिना सुरू आहे. पौष महिन्यात विदर्भात आवर्जून बनवली जाणारी थाळी म्हणजे वाल्याच्या शेंगाची भाजी, मूगाची खिचडी आणि भाकरी किंवा पोळी. हिवाळ्यामध्ये वालाच्या शेंगा खूप पौष्टीक असतात. त्यामुळे डॉक्टर सुद्धा त्या खाण्याचा सल्ला देतात. विदर्भात पौष रविवारला मूगाची खिचडी आणि वालाच्या शेंगाची भाजी हाच बेत बनवला जातो. तुम्ही एरवी सुद्धा बनवू शकता. वालाच्या शेंगाची भाजी कशी बनवायची? याची रेसिपी आपल्याला अमरावतीमधील रसिका शेळके यांनी सांगितली आहे.
Last Updated: Jan 09, 2026, 15:29 ISTभाजपचे वन मंत्री गणेश नाईक यांनी मुलाखतींध्ये म्हटलं, "सिडकोमध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहेत, शासनामध्ये दलाल आहेत. असा आरोप मी विधानसभेत केला आहे. कोणी हरीच्या लालने मला नाही विचारलं की तुम्ही कोणावर आरोप करताय. ज्याला लागलं ते गपचुप बसले. हरामाचा पैसा नवी मुंबई निवडणुकीत वापरत आहेत."
Last Updated: Jan 09, 2026, 15:22 ISTभाजपचे वन मंत्री गणेश नाईक यांनी मुलाखतींध्ये म्हटलं, "माझं काहीही वैयक्तिक मतभेद एकनाथ शिंदेंसोबत नाही. शिंदे म्हणतात की, शिंदेला हलक्यात घेऊ नका. पण कल्याण ग्रामीण ची 14 गावे विकासासाठी घेताना मंत्रालयात बैठक बसवली तेव्हा आम्हाला विचारलंही नाही. म्हणजे गणेश नाईकला हलक्यात घेतला ना ? भाजपने परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेंचा टांगा पण पलटी करेन आणि घोडेपण पण फरार करेन, फरार नाही बेपत्ता करुन टाकेन."
Last Updated: Jan 09, 2026, 15:08 ISTडोंबिवली: महाराष्ट्रात वडापाव मिळत नाही असं एकही शहर आणि गाव नसेल. प्रत्येक शहरात वडापावची काही प्रसिद्ध ठिकाणे असतात. मुंबई आणि वडापाव हे तर वेगळंच समीकरण आहे. डोंबिवलीतही गेल्या 40 वर्षांपासून वडापाव मिळणार एक ठिकाण प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे तीच चव आणि तोच स्वाद जपणाऱ्या श्री साईबाबा वडापावस सेंटरला खवय्यांचा तसाच प्रतिसाद आजही मिळतोय. ‘पाटकर वडापाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वडापावच्या स्टॉलवर खवय्यांची नेहमीच गर्दी असते.
Last Updated: Jan 09, 2026, 14:56 IST