नवरात्रीत हस्त नक्षत्रात पारंपारिकरित्या हादगा खेळला जातो. पूर्वी गावोगावी मुली पाटाभोवती रिंगण धरून गाणी म्हणत, फेर धरून हा सण साजरा करत असत. मात्र, आजच्या पिढीतून या परंपरा लोप पावत चालल्या आहेत. याच गोष्टीची जाणीव ठेवून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील सावे या गावातील विद्यामंदिर सावे शाळेत दरवर्षी हादगा बसवला जातो.