रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे चिरंजिव अनंत अंबानी आणि एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान रिलायन्स ग्रीन्स, जामनगर इथं होणार आहे. या विवाहसोहळ्यासाठी गुजरातमधील कच्छ आणि लालपूर येथील महिला कारागिरांना खास भेट तयार केली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्यासाठी हाताने टेपेस्ट्री विणली आहे. या महिला कारागिरांनी अगदी जुन्या पद्धतीने ही टेपेस्ट्री तयारी केली आहे. स्वदेश समुदायांना सशक्त बनवत आहे आणि जुन्या कलाकुसरीचे जतन करत आहे.