
मुंबई: दारूचे सेवन करणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे सर्वश्रुत आहे, परंतु अनेकदा सामाजिक जीवनात किंवा सवयीमुळे लोक त्याचे सेवन करतात. अशा वेळी दारू पिताना आपण काय खातो, याचा आपल्या शरीरावर खोलवर परिणाम होत असतो. व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अनेक लोक दारू पिताना चुकीच्या खाद्यपदार्थांची निवड करतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या अधिक गंभीर होऊ शकतात.
Last Updated: Jan 05, 2026, 15:11 ISTभाजप मंत्री नारायण राणे हे कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करत आहेत. त्यातच त्यांना चिपळूणच्या कृषी महोत्सव कार्यक्रमात भोवळ आली. त्यामुळे त्यांची तब्बेत ठिक नसल्याचं जाणवतं आहे. त्यांनी कालच राजकारणाच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
Last Updated: Jan 05, 2026, 14:57 ISTथंडी सुरू झाली की पोपटी बनवायला उधाण येतो. नाताळची सुट्टी आणि पोपटीचा आस्वाद घेण्यासाठी लोक शहराकडून गावाकडे जात असतात. गावाकडची नॉनव्हेज पोपटी म्हणजे एक पारंपरिक आणि चविष्ट डिश आहे, ज्यात चिकन, अंडी, वाटाणे, बटाटी आदी भाज्या घेऊन पोपटी करतात. पोपटी करण्यासाठी कुटुंब मित्र परिवार एकत्र येऊन ही पोपटी शेतात किंवा माळावर करतात.
Last Updated: Jan 05, 2026, 13:38 ISTपुणे : महाराष्ट्रभरात कडाक्याची थंडी जाणवत आहे. या थंडीत शरीराला उष्णता देणारे आणि ऊर्जा मिळवून देणारे पदार्थ खाणे आवश्यक असते. बाजरी, तीळ आणि गूळ यापासून बनवलेले पदार्थ थंडीच्या दिवसांत विशेष फायदेशीर ठरतात. बाजरीपासून बनवलेली भाकरी नेहमीच खाल्ली जाते. मात्र रोज-रोज भाकरी खाण्याचा अनेकांना कंटाळा येतो. त्यामुळे आज आपण बाजरीपासून झटपट तयार होणारा आणि चविष्ट असा पदार्थ पाहणार आहोत. तो म्हणजे बाजरीचे घावन. पुण्यातील गृहिणी वसुंधरा पाटुकले यांनी ही रेसिपी सांगितली आहे.
Last Updated: Jan 05, 2026, 13:16 ISTबीड : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पुरुषांमध्ये सतत थकवा जाणवण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पूर्वी शारीरिक मेहनतीशी संबंधित असलेला थकवा आता मानसिक आणि जीवनशैलीशी जोडला गेला आहे. कामाचा वाढता ताण, स्पर्धा, आर्थिक जबाबदाऱ्या आणि वेळेचे दडपण यामुळे अनेक पुरुष दिवसभर दमलेले आणि उत्साहहीन वाटतात. बीड येथील सचिन थेटे या आरोग्य तज्ज्ञांच्या मते हा थकवा केवळ विश्रांती अभावी नसून तो बदलत्या सवयी आणि आरोग्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाचा परिणाम आहे.
Last Updated: Jan 05, 2026, 12:53 IST