
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 9 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि शिंदेंची शिवसेना मिळून कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर बसवणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.दरम्यान कल्याण-डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 नगरसेवक निवडून आले आहेत, पण गट नोंदणीसाठी 9 नगरसेवकच बेलापूर येथील कोकण भवनमध्ये आले होते, त्यामुळे उरलेले 2 नगरसेवक हे शिंदेंच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.