
चंद्रपुरामध्ये कुणाचा महापौर हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यात काँग्रेसमध्ये गटबाजीमुळे त्यांचे मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. धनोरकर आणि विजय वडेट्टीवर यांनी आपआपले नगरसेवक लपवून ठेवले आहेत. भाजप ते नगरसेवक आपल्या गळाला लावतील या भीतीने हे केलं गेलं असं ते म्हणत आहेत. पण काँग्रेसचे नेते असं काहीही नाही असं म्हणाले.