TRENDING:

वसंत पंचमीला पिवळा रंग घालणं का मानलं जात शुभं? 99 टक्के लोकांना माहिती नाही यामागचं सिक्रेट

Last Updated:
शुक्रवार, 23 जानेवारी 2026 रोजी 'वसंत पंचमी' साजरी होत आहे. वसंत पंचमी म्हटली की डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे पिवळा रंग. पण या सणात केवळ 'पिवळ्या' रंगालाच इतके महत्त्व का?
advertisement
1/7
वसंत पंचमीला पिवळा रंग घालणं का मानलं जात शुभं? 99 टक्के लोकांना माहिती नाही
शुक्रवार, 23 जानेवारी 2026 रोजी 'वसंत पंचमी' साजरी होत आहे. वसंत पंचमी म्हटली की डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे पिवळा रंग. या दिवशी लोक पिवळे कपडे परिधान करतात, पिवळे अन्न खातात आणि माता सरस्वतीलाही पिवळी फुले अर्पण करतात. पण या सणात केवळ 'पिवळ्या' रंगालाच इतके महत्त्व का?
advertisement
2/7
निसर्गातील बदल आणि मोहरीची फुले: वसंत ऋतूच्या आगमनावेळी शेतात मोहरीचे पीक बहरलेले असते. सगळीकडे पिवळीधमक फुले डोलताना दिसतात. निसर्ग जणू पिवळ्या रंगाची शाल ओढल्यासारखा दिसतो. निसर्गाशी एकरूप होण्यासाठी या दिवशी पिवळा रंग परिधान करण्याची परंपरा आहे.
advertisement
3/7
माता सरस्वतीचा आवडता रंग: धार्मिक ग्रंथानुसार, माता सरस्वतीला पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. देवी सरस्वतीच्या उत्पत्तीच्या वेळी ब्रह्मांडात प्रथम पिवळ्या रंगाची आभा दिसली होती, असे मानले जाते. म्हणून तिचे भक्त पिवळे वस्त्र परिधान करून तिची आराधना करतात.
advertisement
4/7
गुरु ग्रहाचे प्रतीक: ज्योतिषशास्त्रानुसार पिवळा रंग हा 'बृहस्पती' म्हणजेच 'गुरु' ग्रहाचे प्रतीक आहे. गुरु हा ज्ञान, बुद्धी आणि सौभाग्याचा कारक मानला जातो. वसंत पंचमी हा ज्ञानाचा सण असल्याने गुरुबळ वाढवण्यासाठी पिवळा रंग शुभ ठरतो.
advertisement
5/7
सूर्याच्या ऊर्जेचे प्रतीक: पिवळा रंग हा सूर्याच्या प्रकाशमानाचे आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. थंडी संपून जेव्हा सूर्याचे ऊन प्रखर होऊ लागते, तेव्हा तो बदल स्वीकारण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर केला जातो. हा रंग मनात सकारात्मकता आणि उत्साह निर्माण करतो.
advertisement
6/7
सात्त्विकता आणि शुद्धता: पिवळा रंग हा सात्त्विकतेचे प्रतीक मानला जातो. हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला 'शुद्ध' मानले जाते, म्हणूनच शुभ कार्यात हळदीचा आणि पिवळ्या अक्षतांचा वापर होतो. हा रंग मनाला शांती देणारा आणि तणाव दूर करणारा आहे.
advertisement
7/7
'विद्यारंभ' आणि समृद्धी: वसंत पंचमीला लहान मुलांच्या शिक्षणाची सुरुवात केली जाते. पिवळा रंग हा वाढ आणि समृद्धी दर्शवतो. नवीन सुरुवात करण्यासाठी हा रंग ऊर्जा देणारा ठरतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
वसंत पंचमीला पिवळा रंग घालणं का मानलं जात शुभं? 99 टक्के लोकांना माहिती नाही यामागचं सिक्रेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल