68 व्या वर्षीही जॅकी श्रॉफचा रोमँटिक अंदाज, सगळ्यांसमोर 'धक धक गर्ल' माधुरीला हातावर केलं KISS
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Madhuri Dixit Jackie Shroff : माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ नुकतेच कॉमेडियन कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या सेटवर स्पॉट झाले. यावेळी भिडू 'धक धक गर्ल'च्या हातावर Kiss करताना दिसला.
advertisement
1/7

बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ ही बॉलिवूडची जोडी अनेकांची आवडती आहे. दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे.
advertisement
2/7
माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांनी 'खलनायक' आणि 'राम लखन' यांसारख्या हिट चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. 'खलनायक'मधील त्यांची केमिस्ट्री आणि 'चोली के पीछे' हे गाणं प्रचंड गाजलं.
advertisement
3/7
माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ नुकतेच कॉमेडियन कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या सेटवर स्पॉट झाले. माधुरी आणि जॅकी यांना पुन्हा एकत्र पाहताना अनेक चाहत्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
advertisement
4/7
माधुरी आणि जॅकीच्या व्हायरल व्हिडीओमधील एका गोष्टीने मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. या व्हिडीओमध्ये जेंटलमॅन जॅकी श्रॉफ माधुरीच्या हातावर किस करताना दिसत आहे. भिडूच्या या प्रेमळ कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
advertisement
5/7
माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांनी राम लखन, खलनायक, 100 डेज, प्रेम दीवाने यांसारख्या अनेक अविस्मरणीय चित्रपटांत एकत्र काम केले आहे. आजही ही अनेकांची आवडती जोडी आहे. जॅकी श्रॉफची माधुरी क्रश होती. अनेक मुलाखतींत त्याने याबाबत भाष्य केलं आहे.
advertisement
6/7
'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा'च्या सेटवर माधुरीने काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर मिडी ड्रेस परिधान केला होता. यात ती खूपच सुंदर दिसत होती. दुसरीकडे डॅकीने काळ्या रंगाची जिन्स, कलपफुल शर्ट आणि जॅकेट असा लुक केलाला पाहायला मिळत आहे.
advertisement
7/7
माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांना पुन्हा एकदा एकत्र एका प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. माधुरी आणि जॅकी 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा'च्या शोमध्ये अनेक जुन्या आठवणी ताज्या करताना दिसतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
68 व्या वर्षीही जॅकी श्रॉफचा रोमँटिक अंदाज, सगळ्यांसमोर 'धक धक गर्ल' माधुरीला हातावर केलं KISS