
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा, गाडीवाट येथील विद्यार्थ्यांनी एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. या शाळेतील मुले आता थेट जपानी भाषा बोलताना पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांनी कोणतेही खास क्लास किंवा महागडे प्रशिक्षण न घेता ऑनलाइन माध्यमातूनच जपानी भाषा शिकली आहे. मोबाईल, व्हिडिओ आणि ऑडिओच्या माध्यमातून रोज सराव करत मुलांनी जपानी भाषेवर प्रभुत्व मिळवले आहे.