Bigg Boss Marathi 6 : 'पुढच्या वेळेस घराबाहेर काढेन', भाऊचा शब्द खरा ठरला! तिसऱ्या आठवड्यात सोनाली राऊत आऊट?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बिग बॉस मराठी 6 च्या घरातून तिसऱ्या आठवड्यात आणखी एक स्पर्धक घराबाहेर गेली आहे. भाऊचा शब्द खरा ठरला? नक्की काय झालंय!
advertisement
1/9

बिग बॉस मराठीच्या घरातील तिसरा आठवडा आता संपला आहे. घरातून दुसऱ्या आठवड्यात डान्सर राधा पाटिल घराबाहेर गेली. त्यानंतर आता तिसऱ्या आठवड्यात घरात दुसरं एलिमिनेशन पार पडणार आहे.
advertisement
2/9
या आठवड्यात अभिनेत्री, मॉडेल सोनाली राऊत घराबाहेर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. सोनाली राऊत घरातून आऊट झाल्या असल्याच्या काही पोस्ट सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
advertisement
3/9
दरम्यान दुसऱ्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर सोनाली राऊतला रितेशनं खूप झापलं होतं. सोनालीने शेणाच्या टास्कमध्ये अंगावर शेण पाडून घेण्यास नकार दिला. त्यामुळे बिग बॉसने तिला थेट नॉमिनेट केलं. त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर सोनालीची चांगलीच शाळा घेण्यात आली.
advertisement
4/9
भाऊच्या धक्क्यावर रितेश सोनालीला म्हणाला, "सोनाली तुम्ही ठरवलं त्या शेणाच्या दाराखाली तुम्ही उभे नाही राहणार. तुम्ही आलाच कशाला इथे, टास्क खेळायला आलात ना तुम्ही."
advertisement
5/9
त्यावर सोनाली म्हणाली, "मला जे वाटलं ते मी केलं." त्यावर रितेश तिला म्हणाला, "ओ एक मिनिट, हा अँटिट्यूड घरी ठेवा, या घरात नाही. इथे सगळे सारखे आहेत. यावेळी नॉमिनेट केलंय पुढच्या वेळेस घराबाहेर काढेन."
advertisement
6/9
भाऊच्या धक्क्यावप रितेशनं बोललेले शब्द खरंच खरे ठरले का? सोनाली राऊत तिसऱ्या आठवड्यातून खरंच घराबाहेर गेली आहे का याचं उत्तर शनिवारी आणि रविवारच्या भाऊच्या धक्क्यावर मिळणार आहे.
advertisement
7/9
सोनाली राऊत पहिल्या आठवड्यात खूप चांगलं खेळताना दिसली होती. तिचं आणि रुचिता जामदार यांच्यात भांडण झालं होतं. त्यानंतर सोनालीने तिला चांगल्या पद्धतीने समजावलं होतं. त्यावेळेस सोनालीची मॅच्युरिटी तिथे पाहायला मिळाली ज्यात भाऊच्या धक्क्यावरही कौतुक झालं.
advertisement
8/9
पहिल्या आठवड्यात सोनाली राऊतचीच चावी अनुश्री माने हिनं चोरली होती. त्यावरून घरात मोठा राडा झाला. पण या सगळ्यात सोनाली मात्र सेफ गेम खेळली. त्यानंतर मात्र सोनालीने अनेकदा बिग बॉसच नियम मोडले. ज्यामुळे तिला भाऊच्या धक्क्यावर झापण्यात आलं.
advertisement
9/9
आता तिसऱ्या आठवड्यात सोनाली राऊत बिग बॉसच्या घरातून आऊट झाली आहे का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सोनाली राऊत बिग बॉस मराठी 6 मधून आऊट झाली असल्याची कोणतीही माहिती कलर्स मराठी वाहिनीकडून अद्याप देण्यात आलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : 'पुढच्या वेळेस घराबाहेर काढेन', भाऊचा शब्द खरा ठरला! तिसऱ्या आठवड्यात सोनाली राऊत आऊट?