
अमरावती : पूर्वीच्या काळात सर्व ग्रामीण भागांत घराच्या छतावर कवेलू वापरण्यात येत होते. जास्तीत जास्त घरे ही कवेलू वापरून बनवली जात होती. आताही अनेक भागांत कवेलूची घरे आपल्याला बघायला मिळतात. पण, अमरावती जिल्ह्यातील एक असे गाव आहे ज्याठिकाणी कधीच कवेलू वापरले गेले नाही. आताही कुठेच कवेलू दिसत नाहीत. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील देवुरवाडा हे गाव देवाचा वाडा म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्याचबरोबर या गावात कवेलू कधीच वापरल्या जात नाहीत. ज्या वेळी घर बांधण्यासाठी काहीच मिळत नव्हतं त्यावेळी तेथील नागरिकांनी गवत आणि काठी वापरून घराचे छत तयार केले पण कधीही कौलारू घरे बांधली नाहीत.