Goa, रशियन, शरिरसंबंध अन् मोक्ष, त्याने एक एक करून 15 तरुणींना संपवलं, सीरियल किलरची INSIDE STROY
- Published by:Sachin S
Last Updated:
पोलीस चौकशीत त्याने १५ महिलांना 'मोक्ष' दिल्याचा दावा केला आहे. पैशांसाठी तो रशियन महिलांशी मैत्री करायचा. नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून खून करायचा. (ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी)
advertisement
1/9

चार्ल्स शोभराज नावाच्या सिरीयल किलरने एकेकाळी गोव्यासह देशभरात हैदोस घातला होता. शेवटी तो गोव्यातच पकडला गेला. आज पुन्हा एकदा गोवेकरांना चार्ल्स सारख्या सिरीयल किलरचं कृत्य पाहण्यास मिळालं. एका माथेफिरूने 15 महिलांचा खून केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. हा सिरीयल किलर रशियन महिलांना हेरायचा, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायला आणि नंतर शरीर संबंध ठेवून खून करायचा. या प्रकरणामुळे संपूर्ण गोवा हादरलं आहे.
advertisement
2/9
मोरजी आणि हरमल इथं रशियन महिलांच्या निर्घृण खून प्रकरणामुळे गोव्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयित आलेक्सेई लिओनोव याने पोलीस चौकशीत आणखी १५ महिलांना 'मोक्ष' दिल्याचा दावा केला आहे. पैशांसाठीच आलेक्सेईने रशियन महिलांशी मैत्री करायचा. नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून खून करत होता. त्याच्या चौकशीतून उघड झालं आहे.
advertisement
3/9
रशियन महिलांना करायचा शिकार - आलेक्सेई लिओनोव हा सिरीयल किलर पोलिसांच्या ताब्यात आहे. पण त्याने जे सांगितलं ते ऐकून पोलीसही हैराण झाले आहे. ओलेक्सेई हा मुळचा रशियाचा. त्यामुळे त्याला रशियन भाषा सहज येत होते. गोव्यात फिरण्यासाठी आलेल्या रशियन तरुणी आणि महिलांवर तो नजर ठेवायचा. रशियन असल्यामुळे तो त्यांच्याशी जवळीक साधायचा.
advertisement
4/9
इतक्या दूर आपल्या देशातला माणूस इथं असल्यामुळे रशियन तरुणी आलेक्सेई लिओनोवशी बिनधास्त बोलायच्या. हेच साधून तो त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायला. रशियन महिला आपल्या प्रेमात पडल्यानंतर हा माथेफिरू त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करायला. नंतर त्यांच्याकडून चलाखीने पैसे उकळत होता. मात्र, महिला अन्य व्यक्तीच्या संपर्कात असल्याचं समजताच तो तिचा खून करायचा.
advertisement
5/9
१५ महिलांना दिला मोक्ष - पोलिसांनी जेव्हा आलेक्सेईला खाक्या दाखवल्या तेव्हा तो पोपटासारखा बोलू लागला. पण, या माथेफिरूने वेगळाच दावा केला. आपण १५ महिलांचाा खून केला नाहीतर त्यांना मोक्ष दिलं आहे, असा अजब दावा केला.
advertisement
6/9
आलेक्सेईने गोवा आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये मिळून हे खून केल्याचं सांगितलं आहे. आलेक्सेई हा माथेफिरू होता. ज्या महिलांशी तो संबंध ठेवत होता, त्यांनी जर इतर कुणाशी संपर्क साधला तर त्याला त्याचा राग यायचा. त्यामुळे त्या महिलांचा तो खून करायचा.
advertisement
7/9
आलेक्सेई पोलिसांना कसा सापडला? पेडणे तालुक्यातील बामनभाटी-हरमल इथं एका 35 वर्षीय एलिना नावाच्या महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली. तर मोरजीमध्ये 37 वर्षीय एलिना वानिवा या रशियन महिलेचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला होता. मांद्रे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा आलेक्सेईपर्यंत पोहोचले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, त्याने १५ महिलांचा खून केल्याचा दावा केला आहे.
advertisement
8/9
आतापर्यंत सापडले २ महिलांचे मृतदेह - पोलिसांनी या प्रकरणी पुरावे गोळा करण्याचं काम पहिले हाती घेतलं. आतापर्यंत पोलिसांना या प्रकरणात दोन महिलांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. आलेक्सेईने १५ महिलांचा खून केला असल्याचं सांगितलं आहे, त्यामुळे पोलीस आता उर्वरीत महिलांचा मृतदेह शोध घेत आहे
advertisement
9/9
कोठडीत चौकशीवेळीही तो सारखं आपली विधान बदलत आहे. त्यामुळे प्रकरणात गुंतागुंत वाढत आहे. पोलिसांनी या प्रकरणात सावधगिरी बाळगत किनारी भागात झाडाझडती मोहीम सुरू केली आहे. आरोपी राहात असलेल्या खोल्यांची तपासणी केली जात आहे. आलेक्सेई हा कुठे राहात होता याचाही शोध पोलीस घेत आहेत. २ दिवसांपासून पोलिसांनी दिवसरात्र विविध भागात तपास केला. हिमाचल प्रदेशमधील पोलिसांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती मिळते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/गोवा/
Goa, रशियन, शरिरसंबंध अन् मोक्ष, त्याने एक एक करून 15 तरुणींना संपवलं, सीरियल किलरची INSIDE STROY