
पत्रकारांशी बोलताना मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी हे आधीच सांगितसं होतं आणि राजकिय दृष्ट्या दिसत होतं. ठाकरेंच्या युतीत बिग्गेस्ट लुजर हे मनसेच होणार.माझं जे भाकित होतं ते या निवडणुकीनं स्पष्ट केलं आहे.
Last Updated: Jan 17, 2026, 21:23 ISTखलापूरमधील एचपी नॅशनल कंपनीत भीषण आग लागली. त्यामुळे खूपच स्फोट होत आहेत. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. आगीच कारण अस्पष्ट आहे.
Last Updated: Jan 17, 2026, 21:36 ISTपिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पराभव झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांना अमोल बालवडकरांनी टोलेबाजी लगावली आहे. तेव्हा ते म्हणाले, "भाजपच्या डुप्लिकेट पैलवानांनी दंड थोपटू नये. मतदारांनी तुमच्याकडे पाहून नाही तर मोदींच्या कामाकडे पाहून मतं दिली आहेत. आमच्या अजित दादांच्या नादी लागू नका. या नेत्यांना अहंकार झाला आहे."
Last Updated: Jan 17, 2026, 21:01 ISTकोल्हापुरात पालिका निवडणुकानंतर शिवाजी पेठात तुफान राडा झाला आहे. त्यात माजी महापौरांसह पाच जण जखमी झाले आहेत. तर अनेक गाड्यांचं नुकसान झाले. ५० लोकांवर गुन्हा दाखल केला गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला .
Last Updated: Jan 17, 2026, 20:10 ISTया पालिका निवडणुकीत भाजपचा झंझावात पाहायला मिळाला, ठाकरेंची काटे कि टक्कर, शिंदेंनी ठाण्यात बालेकिल्ला राखला, तर एमआयएमने खातं उघडलं, तर वंचित बहूजन आघाडीची थाटात एंट्री होताना दिसली.
Last Updated: Jan 17, 2026, 19:30 IST