
शिंदेसेनेने थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 नगरसेवकांना सोबत घेत सत्ता स्थापनेचा दावा करत भाजपला मोठा धक्का दिला आहे.अंबरनाथमध्ये उपनगराध्यक्षपदी एनसीपीचे उमेदवार सदाशिव पाटील यांची निवड झाली. श्रीकांत शिंदेंच्या या खेळीने भाजप घायाळ झाला आहे.
Last Updated: Jan 12, 2026, 20:03 ISTठाण्यात ठाकरे बंधूंची सभा जोरदार सुरु आहे. त्यात राज ठाकरें म्हणाले," भाजपने काहींना १५ कोटींची ऑफर दिली होती. ती त्यांनी नाकारली आणि मिवडणुकीला उभे राहिले. दुसरे पाच कोटींची ऑफर एका लेडीने नाकारली."
Last Updated: Jan 12, 2026, 21:21 ISTठाण्यात ठाकरे बंधूंची सभा जोरदार सुरु आहे. त्यात राज ठाकरें म्हणाले, "मला वाटलं फडणवीसांना इंग्रजी कळतं. मला आत्ताच कुणीतरी क्लीप पाठवली. लाव रे तो व्हिडिओ."
Last Updated: Jan 12, 2026, 21:15 ISTठाण्यात ठाकरे बंधूंची सभा जोरदार सुरु आहे. त्यात राज ठाकरें म्हणाले," हे ठाणे , मुंबई ही महाराष्ट्राची आहे. आपण सगळे एकत्र राहतो. गुण्यागोविंदाने राहतो तुमची भाषा वेगळी आहे ठिक आहे. पण आमच्या घरी यायचं कपाट दुरुस्तीला आणि बायकोकडे नजर टाकायची, चालणार नाही."
Last Updated: Jan 12, 2026, 21:04 ISTठाण्यात ठाकरे बंधूंची सभा जोरदार सुरु आहे. त्यात राज ठाकरेंनी एबी फॉर्म वरुन विषय काढला. त्यात त्यांनी कोटी करत म्हणाले, एबी फॉर्म गिळतात काय, एकाने रात्री एबी फॉर्म गिळला पण एखादा दिवस मिळाला असता तर वाट पाहता आली असती दुसऱ्या दिवशी. "
Last Updated: Jan 12, 2026, 20:45 ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आता गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याने शाब्दिक वादावादी चालू झाली. त्यात वाद आता गुन्हेगारांवरुन कोयता गँगवर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे गुन्हेगारांना उमेदवारी देताना विचार करायला हवा असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
Last Updated: Jan 12, 2026, 20:32 IST