
शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांचे निवडून आलेले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. हा वाद आता थेट दिल्ली दरबारी गेला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने भाजपची तक्रार थेट केंद्रीय नेतृत्वाकडे गेली असून मुंबईत भाजपामुळे शिवसेनेचं सर्वात जास्त नुकसान झाल्याचा दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.