नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी (Rabale MIDC) परिसरातील प्लॉट नंबर R/N 952 मध्ये असलेल्या जेल फार्मासिटिकल (Gel Pharmaceutical) या मेण (Wax) आणि केमिकलचे साहित्य बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या कंपनीत केमिकलचा साठा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले आहे आणि १२ तास होऊनही आग पूर्णपणे विझवण्यात अग्निशमन दलाला (Fire Brigade) अडथळे येत आहेत. या घटनेत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. ऐरोली आणि वाशी येथील अग्निशमन विभागाच्या १० ते १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.