
मुंबई : लालबाग गणेशगल्ली परिसरात डॉमिनोजच्या शेजारी नुकताच सुरू झालेला खाओमोर हा नवा फूड स्पॉट अल्पावधीतच नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे. परवडणाऱ्या दरात विविध प्रकारचे चवदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेमुळे खाओमोरने परिसरातील खाद्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.
Last Updated: Jan 07, 2026, 12:53 ISTपुणे : यकृत आणि प्लीहामधील मोठ्या कर्करोगजन्य गाठींमुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या 13 वर्षीय पाळीव कुत्र्यावर पुण्यातील द स्मॉल ॲनिमल क्लिनिकमध्ये जगातील पहिली यशस्वी कॅथलॅब एम्बोलायझेशन प्रक्रिया पार पडली. पारंपरिक खुल्या शस्त्रक्रियेमुळे होणारा जीवघेणा रक्तस्राव टाळत या उपचारामुळे 2.5 किलो वजनाची गाठ कमी करण्यात यश आले असून कुत्र्याला नवे आयुष्य मिळाले आहे.
Last Updated: Jan 09, 2026, 14:03 ISTपुणे : अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रांतीचा सण येऊन ठेपला आहे. या सणात तिळाला विशेष महत्त्व दिले जाते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत एकमेकांना तिळगुळ देण्याची परंपरा आहे. संक्रांतीच्या निमित्ताने घराघरात तिळाच्या वड्या, तिळाच्या पोळ्या यांसारखे पदार्थ तयार केले जातात. याचबरोबर विवाहित स्त्रिया आपल्या ओवश्यांमध्येही तिळाचा वापर करतात. मात्र या सणात तिळालाच इतके महत्त्व का दिले जाते? संक्रांतीचा आणि तिळाचा नेमका काय संबंध आहे? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
Last Updated: Jan 09, 2026, 13:26 ISTछत्रपती संभाजीनगर : हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. सध्याला सर्वत्रच कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. या हिवाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे नट्स किंवा ड्रायफ्रूट खात असतो. कारण की ते आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. यापैकीच एक महत्त्वाचा नट्स म्हणजे बदाम. बदाम खाल्ल्याने अनेक फायदे आपल्या शरीराला मिळत असतात. तर बदाम खाण्याचे काय फायदे होतात? याविषयीच आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: Jan 09, 2026, 13:05 ISTअंबरनाथ नगर पालिका निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस नगरसेवकांनी युती केल्यामुळे वरिष्ठ स्तरावरील नाराजी व्यक्त केली गेली. काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले नगरसेवक थेटपणे भारतीय जनता पक्षात गेल्याने काँग्रेसला जबर झटका बसला. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने पक्ष कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. राज्य आणि देशपातळीवर विचारधारेच्या मुद्द्यावरून लढणाऱ्या काँग्रेस-भाजपची युती झाल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. दोन्ही पक्षांवर टीका सुरू झाल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पावले उचलून नगरसेवकांवर कारवाई करण्याचे पाऊल उचलले.
Last Updated: Jan 08, 2026, 21:47 ISTपिंपरी चिंचवड मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्यात शाब्दिक वाद रंगला आहे. तेव्हा प्रचारात पवारांनी पूलाचा भष्टाचार काढत वादाला आमंत्रण दिलं आहे. विरोधकांनी पवारांनी आत्मपरिक्षण करांवं असं म्हटलं आहे.
Last Updated: Jan 08, 2026, 21:39 IST