TRENDING:

Shattila Ekadashi: मकर संक्रातीच्या दिवशीच षट्तिला एकादशी! या 3 राशींचा गोल्डन टाईम नव्यानं सुरू

Last Updated:
Shattila Ekadashi: सण-उत्सवात ग्रहांचे राशीपरिवर्तन होणं ही भाग्याची गोष्ट आहे. त्याचा राशीचक्रावर शुभ परिणाम पाहायला मिळतो. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा सूर्य देव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतात, तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते. हा दिवस प्रगती, सकारात्मक ऊर्जा आणि नवीन कामांच्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. यावर्षी सूर्य देव 14 जानेवारीला दुपारी 3 वाजून 13 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करतील.
advertisement
1/5
मकर संक्रातीच्या दिवशीच षट्तिला एकादशी! या 3 राशींचा गोल्डन टाईम नव्यानं सुरू
धार्मिक मान्यतेनुसार, मकर संक्रांतीला सूर्य पूजा, स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. यावेळी हा सण अधिक खास आहे कारण याच दिवशी षटतिला एकादशीचा दुर्मिळ योगायोग जुळून येत आहे. शास्त्रांनुसार, या योगात सूर्य देव आणि भगवान विष्णू या दोघांची विशेष कृपा प्राप्त होईल.
advertisement
2/5
या शुभ संयोगाचा परिणाम ज्योतिषीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा मानला जात आहे. या काळात काही राशींच्या आयुष्यात करिअर, नोकरी, व्यापार आणि आर्थिक स्थितीत चांगले बदल पाहायला मिळू शकतात.
advertisement
3/5
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांती आणि षटतिला एकादशीचा हा संयोग आर्थिक प्रगतीचे संकेत घेऊन येत आहे. उत्पन्नात वाढ होण्याचे योग बनू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना पगारवाढ किंवा एखादी नवीन संधी मिळू शकते. व्यापाराशी संबंधित लोकांना फायदेशीर सौदे मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही परदेशी कंपन्यांशी किंवा बाहेरील क्लायंटशी जोडलेले असाल, तर अडकलेले पैसे परत मिळू शकतात. वैवाहिक जीवनाबाबत सकारात्मक संकेत आहेत, विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. समाज आणि कुटुंब दोन्ही ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल.
advertisement
4/5
सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ नात्यांमध्ये आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. एखाद्या खास व्यक्तीच्या येण्याने आयुष्यात नवीन आनंद मिळू शकतो. सरकारी क्षेत्राशी संबंधित कामांमधील अडथळे दूर होऊ शकतात. निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल, ज्यामुळे मोठ्या निर्णयांमध्ये यश मिळेल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. प्रमोशन किंवा पदोन्नतीशी संबंधित चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि कार्यक्षेत्रात तुमची ओळख मजबूत होईल.
advertisement
5/5
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी हा संयोग नवीन संधी आणि स्थिरतेचा संकेत देत आहे. तुम्ही एखाद्या नवीन कामाची किंवा प्रकल्पाची सुरुवात करू शकता. व्यापारात फायदेशीर करार होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे संकेत आहेत. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी पगारवाढ किंवा पदोन्नतीचे योग येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाची दखल घेतली जाईल. आत्मविश्वास वाढण्यासोबतच आध्यात्मिक कामांकडे कल वाढू शकतो, ज्यामुळे मानसिक संतुलन टिकून राहील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shattila Ekadashi: मकर संक्रातीच्या दिवशीच षट्तिला एकादशी! या 3 राशींचा गोल्डन टाईम नव्यानं सुरू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल