TRENDING:

ऑस्ट्रेलियातून 'मास्टर्स' केलं अन् नाशिकमध्ये चहाचा स्टॉल लावला! आर्किटेक्ट तरुणानं कसं फिरवलं नशिबाचं चाक?

नाशिक: जिद्द आणि कष्टाची तयारी असेल तर कोणतेही काम छोटे नसते, हे नाशिकच्या एका तरुण आर्किटेक्टने सिद्ध करून दाखवले आहे. ऑस्ट्रेलियातून उच्च शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतलेल्या पुष्कर चोरडिया या तरुणाने नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा रोड साईड व्यवसाय सुरू केला आहे. आज तो दिवसा नोकरी आणि सायंकाळी आपला व्यवसाय सांभाळून महिन्याकाठी 50 हजार रुपयांहून अधिक उलाढाल करत आहे.

Last Updated: Jan 11, 2026, 16:48 IST
Advertisement

राम का नही वो किसी काम का नही, मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल, VIDEO

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये प्रचार सभा झाली. तेव्हा त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "काल परवा 2 भाऊ आले पण श्रीरामालाच विसरले,जो राम का नही वो किसी काम का नही."

Last Updated: Jan 11, 2026, 16:56 IST

' रेल्वेचे डबे वाढणार, लाडकी बहिण योजना चालूच राहिल,' महायुतीच्या जाहीरनाम्यात आश्वासनांची भली मोठी लिस्ट, VIDEO

ठाकरे बंधूंच्या शिवशक्ती युतीने वचननामा जाहीर केल्यानंतर आज शिवसेना शिंदे गट-भाजपने आपला जाहीरनामा जाहीर केला. मतदानाला आता काही दिवसच शिल्लक असताना महायुतीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.महायुतीच्या जाहीरनाम्यात पायाभूत सुविधांपासून, आरोग्य, शिक्षण अशा वेगवेगळ्या मुद्यांवर आश्वासन देण्यात आले आहेत.

Last Updated: Jan 11, 2026, 16:42 IST
Advertisement

हिवाळ्यात करा शेवग्याच्या फुलांची भाजी, आरोग्यासाठी फायदेशीर, रेसिपीचा Video

अमरावती : हिवाळ्यात शेवग्याला भरघोस फुलं येतात. ही फुलं किंचित गोडसर चवीची असून विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात विशेषतः खाल्ली जातात. शेवग्याच्या फुलांमध्ये कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते. तसेच व्हिटॅमिन A, C आणि अँटिऑक्सिडंट्स सुद्धा असतात. फायबर देखील असते. त्यामुळे ही फुलं आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. या फुलांची भाजी बनवून तुम्ही आहारात घेऊ शकता. त्याची रेसिपी जाणून घ्या.

Last Updated: Jan 11, 2026, 16:33 IST

माझ्या मुलीसाठी सीट द्या म्हटलं पण नाही दिली, ठाकरेंचे शिलेदार दगडू सपकाळ थेट शिंदेंच्या ताफ्यात दाखल, VIDEO

सध्या मुंबई महापालिकेचा प्रचार जोरदार सुरु असताना आता ठाकरे गटाचे माजी आमदार दगडू सपकाळ यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत थेट ठाकरेंच्या सेनेला धक्का दिला आहे. त्यांच्या मुलीला तिकीट न दिल्याने ठाकरेंची साथ सोडल्याचं ते म्हणाले आहेत.

Last Updated: Jan 11, 2026, 16:26 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/नाशिक/
ऑस्ट्रेलियातून 'मास्टर्स' केलं अन् नाशिकमध्ये चहाचा स्टॉल लावला! आर्किटेक्ट तरुणानं कसं फिरवलं नशिबाचं चाक?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल