TRENDING:

Sachin Pilgaonkar: मैत्रीच्या आड 'तो' तिसरा आला अन्... 43 वर्षांनंतर अभिनेत्रीने सांगितलं महागुरुंसोबत तेव्हा काय घडलं?

Last Updated:
पडद्यावरच्या 'चंदन आणि गुंजा'च्या जोडीमध्ये खऱ्या आयुष्यात मात्र एक मोठी दरी निर्माण झाली होती. तब्बल ४३ वर्षांनंतर, अभिनेत्री साधना सिंग यांनी त्यांच्या आणि सचिन पिळगांवकर यांच्या तुटलेल्या मैत्रीबद्दल एक खळबळजनक खुलासा केला आहे.
advertisement
1/8
43 वर्षांनंतर अभिनेत्रीने सांगितलं महागुरुंसोबत तेव्हा काय घडलं?
मुंबई: आजच्या 'ॲक्शन' आणि 'क्राईम' थ्रिलरच्या जमान्यात जेव्हा आपण मागे वळून पाहतो, तेव्हा एक निरागस प्रेमकहाणी डोळ्यांसमोर येते, ती म्हणजे 'नदिया के पार'. १९८२ मध्ये आलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं.
advertisement
2/8
पण या पडद्यावरच्या 'चंदन आणि गुंजा'च्या जोडीमध्ये खऱ्या आयुष्यात मात्र एक मोठी दरी निर्माण झाली होती. तब्बल ४३ वर्षांनंतर, अभिनेत्री साधना सिंग यांनी त्यांच्या आणि सचिन पिळगांवकर यांच्या तुटलेल्या मैत्रीबद्दल एक खळबळजनक खुलासा केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
advertisement
3/8
साधना सिंग यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जुन्या दिवसांना उजाळा दिला. त्या सांगतात की, सचिन पिळगांवकर हे तेव्हाचे सुपरस्टार होते आणि साधना मुंबईत अगदीच नवीन होत्या. एका संगीत मैफिलीत त्यांची ओळख झाली.
advertisement
4/8
जेव्हा 'नदिया के पार'साठी हिरोईन शोधली जात होती, तेव्हा सचिनला कल्पनाही नव्हती की समोर कोण असणार आहे. पण साधनाचा फोटो पाहताच सचिन आनंदाने ओरडले, "अरे, ही तर साधना! मी हिला खूप चांगलं ओळखतो." इथूनच त्यांच्या मैत्रीच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली.
advertisement
5/8
शूटिंग दरम्यान ही जोडी इतकी जवळ आली की बाहेर त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. पण साधना यांनी स्पष्ट केलं की, त्यांच्यात केवळ निखळ मैत्री होती. मात्र, ही मैत्री जास्त काळ टिकू शकली नाही. साधना सांगतात, "आमच्या मैत्रीत एका तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली आणि सगळं गणित बिघडलं. त्या एका माणसामुळे सचिन केवळ माझ्यापासूनच नाही, तर माझ्या पतीपासूनही दूर गेले."
advertisement
6/8
साधना यांचे पती राजकुमार शहाबादी, जे स्वतः एक प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत; यांच्याशीही सचिन यांचे जवळचे संबंध होते. पण त्या तिसऱ्या व्यक्तीने केलेल्या कानभरणीमुळे हे दोन मित्र कायमचे एकमेकांपासून दुरावले. आजही ते भेटले की औपचारिकतेने बोलतात, पण ती जुनी ओढ आता उरलेली नाही.
advertisement
7/8
साधना सिंग यांनी भोजपुरी सिनेमाचे दिग्गज निर्माते विश्वनाथ प्रसाद शहाबादी यांचे सुपुत्र राजकुमार शहाबादी यांच्याशी लग्न करून आपला संसार थाटला. त्यांना शीना शहाबादी ही अभिनेत्री मुलगी आणि एक मुलगा आहे. चित्रपटसृष्टीतील या मोठ्या घराण्याशी संबंधित असूनही साधना यांनी 'नदिया के पार' नंतर निवडकच कामं केली.
advertisement
8/8
तुम्ही सलमान-माधुरीचा 'हम आपके हैं कौन' पाहिला असेलच, पण तो सिनेमा म्हणजे 'नदिया के पार'चाच आधुनिक अवतार आहे. मेहुण्याशी लग्न ठरलेली मेहुणी आणि तिचा दीर यांची ती अस्वस्थ करणारी प्रेमकहाणी सूरज बडजात्या यांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर मांडली होती. पण 'जोगी जी धीरे धीरे' आणि 'कौन दिशा में लेके चला रे बटोहिया' या गाण्यांनी जी जादू केली, ती आजही कायम आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sachin Pilgaonkar: मैत्रीच्या आड 'तो' तिसरा आला अन्... 43 वर्षांनंतर अभिनेत्रीने सांगितलं महागुरुंसोबत तेव्हा काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल