भारतात 'HMPV' व्हायरसचे दोन रूग्ण आढळलेत. कर्नाटकची राजधानी बंगळुरूत 3 महिन्यांच्या बाळाला 'HMPV' व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. आता कर्नाटकातील आणखी एका बाळाला एचएमपीव्ही व्हायरसची लागण झाल्याचं उघड झालंय. 8 महिन्याच्या बाळालाही HMPV ची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. खासगी लॅबच्या चाचणीत 'HMPV' व्हायरस बाळाला झाल्याचं उघड झालंय. सरकारच्या आरोग्य विभागानं आता बाळाचे नमुने तपासणीसाठी पाठवलेत. 'HMPV' व्हायरसबाबत राज्य सरकार सतर्क असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश अबीटकर यांनी केलं. येत्या गुरूवारी नव्या व्हायरसबाबत आणि त्याबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.