प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात आज देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी हाजरी लावली. या दरम्यान अनेक साधू संत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. या पावन महाकुंभ मेळ्यात स्नान करण्यासाठी अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती. आणि आज महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नानासाठी अमित शाह हे आले आहेत. प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमध्ये डुबकी लगावत त्यांनी पवित्र स्नान केले.