
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विधानसभेत सुनेत्रा पवार, पार्थ पवार एकत्र विधानसभेत दाखल झाले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. त्यानंतर माध्यमांशी संंवाद साधताना पार्थ पवारांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. अजितदादांनी मी खूप मिस करतोय, आज ते असते तर त्यांना प्रचंड आनंद झाला असता, असे देखील पार्थ पवार यावेळी म्हणाले.