TRENDING:

Political Report : अबरनाथमध्ये भाजपला शिंदेंच्या शिवसेनेचा धक्का, चव्हाणांची खेळी उलटवली

Videos

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपालिकेतील गेल्या महिनाभरापासून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. येथील घडामोडींची चर्चा राज्यात नाही तर दिल्लीत देखील झाली. अंबरनाथमध्ये भाजपने एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी थेट काँग्रेसशी युती केली . ही विचित्र युती देशभरात चर्चेचा विषय ठरली. यानंतर काँग्रेसनं त्यांच्या 12 नगरसेवकांचं निलंबन केलं. या नगरसेवकांना भाजपनं आपल्या पक्षात घेतलं. सत्ता स्थापनेचा दावा केला. पण आता श्रीकांत शिंदेंनी मोठी राजकीय खेळी करत भाजपला धक्का दिला आहे.

Last Updated: Jan 09, 2026, 19:34 IST
Advertisement

जेवणासोबत नेहमी चटपटीत हवंय? कमी वेळात बनवा गाजराचे लोणचे, दररोज एकदम आवडीने खाल

Food

अमरावती : जेवण करताना नेहमी त्यासोबत काही तरी चटपटीत पाहिजे असतं. आंबा आणि लिंबूचे लोणचे तर आपल्याकडे असतेच. पण, हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या मार्केटमध्ये येतात. फळभाज्या आणि पालेभाज्या पौष्टीक असल्याने वेगवेगळी पद्धत वापरून नवनवीन पदार्थ बनवल्या जाते. हिवाळ्यामध्ये तुम्ही झटपट असे गाजराचे लोणचे सुद्धा बनवू शकता. अगदी कमी वेळात चटपटीत असे गाजराचे लोणचे तुम्ही तयार करू शकता. गाजराचे लोणचे ही रेसिपी अमरावती मधील वृषाली भुजाडे यांनी सांगितली आहे.

Last Updated: Jan 10, 2026, 15:57 IST

'भाकरी, शेंगा चटणी, कुरडा सोलापूरची ओळख,' डाळींबाच्या राजधानीत कमळ फुलणार ? मुख्यमंत्री फडणवीसांनी सभा गाजवली, VIDEO

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरमध्ये जाहिर सभा झाली. त्यात त्यांनी मतदारांना मार्गदर्शन केले. तेव्हा ते म्हणाले, "सोलापूर हे दक्षिण भागाचं प्रवेशद्वार आहे. हा जिल्हा डाळींबाची राजधानी म्हणून ओळख आहे. तसेच 'भाकरी, शेंगा चटणी, कुरडा सोलापूरची ओळख आहे. आता आधुनिक ओळख निर्माण करायची आहे. 70 वर्ष या शहराकडे दुर्लक्ष झालं."

Last Updated: Jan 10, 2026, 15:46 IST
Advertisement

'मुंबई महाराष्ट्राची नाही', भाजप नेते अण्णामलाईंच्या वादग्रस्त वक्तव्याने वादाची ठिणगी, VIDEO

मुंबई पालिका निवडणुक प्रचारासाठी भाजपने अमराठी नेत्यांसाठी बिहार, तमिळनाडू या राज्यातून नेते मागवले आहेत. त्यातच आता तमिळनाडूचे भाजप नेते अण्णामलाई यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले, "मुंबई महाराष्ट्राची नाही. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे." त्यामुळे आता या नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Last Updated: Jan 10, 2026, 15:21 IST

का साजरी करायची मकर संक्रांत? का खायचे तिळगूळ? सणाचं नेमक महत्व काय? Video

पुणे

पुणे : सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. प्रत्येक महिन्यात सूर्य एक रास बदलतो. मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात. फेब्रुवारीमध्ये कुंभ संक्रांत असते. मार्चमध्ये मीन, एप्रिलमध्ये मेष, मग वृषभ असा संक्रांतीचा क्रम असतो. तरीही मकर संक्रांती साजरी का साजरी केली जाते? याबाबत पुणे येथील ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: Jan 10, 2026, 15:20 IST
Advertisement

टीका होताच भाजप नगरसेवक तुषार आपटेंचा तडकाफडकी राजीनामा ..,VIDEO

भाजपचे तुषार आपटे यांनी बदलापूरच्या स्वीकृत नगरसेवक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. टीका केल्यामुळे हा राजीनामा ते देणार असल्याची माहिती समोर आली आहे. लैंगिक गुन्हेगारीमध्ये त्यांना अटक केली होती त्यामुळे त्यांना या मोठ्या टीकेला सोमोरे जावं लागलं होतं.

Last Updated: Jan 10, 2026, 14:55 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/
Political Report : अबरनाथमध्ये भाजपला शिंदेंच्या शिवसेनेचा धक्का, चव्हाणांची खेळी उलटवली
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल