
साताऱ्यात नायगावमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केले. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर भाषण केले.
Last Updated: Jan 03, 2026, 21:18 ISTआज छ.संभाजीनगर येथे प्रभाग क्र.12 मध्ये उमेदवाराला चिन्ह बदलून दिले असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर केला आहे. अबादास दानवे हे स्मार्ट सिटी कार्यालयात गेले असता हे सगळं प्रकरण त्यांनी बाहेर काढले आहे.
Last Updated: Jan 03, 2026, 20:44 ISTअजित पवार सध्या चर्चेत आहेत. पिंपरी-चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणुक लढवत आहेत. तेव्हा त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत मागे पोस्टरवर अजित पवार आणि शरद वपार यांचा एकत्र फोटो दिसला. तेव्हा पत्रकाराने प्रश्न विचारला की हा फोटो आतापुरता आहे की कायमस्वरुपी असणार आहे ? तेव्हा त्यांनी एक उत्तर दिलं 'तुझ्या तोंडात साखर पडो'. तेव्हा दादांचं हे विधान आणि चर्चेला उधाण आले आहे.
Last Updated: Jan 03, 2026, 20:30 ISTबिनविरोधावरुन आता मोठा विरोध सुरु आहे. पालिका निवडणुकीमध्ये मतदानाआधीच विजयाचा गुलाल सत्ताधाऱ्यांनी उधळला खरा, पण आता तो गुलाल उतरताना दिसणार आहे. त्यामुळे आता ही बिनविरोध निवडणुक आणि विजयी नेते आयोगाच्या रडारवर पाहायला मिळणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, मनसे नेते यांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप केले आहेत.
Last Updated: Jan 03, 2026, 20:10 ISTपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत होत आहे. काल अजित पवारांनी भाजपवर पिंपरीत हल्लाबोल केला होता. त्यामुळे भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांना इशारा दिला आहे. तेव्हा ते म्हणाले, "मी खाजगीत देवेंद्र फडणवीसांना सांगत होतो दादांना सोबत घेताना साहेब विचार करा.पैलवानांच्या नादी लागायचं नसतं"
Last Updated: Jan 03, 2026, 19:46 IST