
छत्रपती संभाजीनगर : शेतकरी सध्या व्यवसाय करण्याला प्राधान्य देत आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंभेफळ गावातील राजू गोजे हे 3 वर्षांपासून दूध संकलन केंद्र चालवतात. सुरुवातीच्या काळात 80 लिटरच्या जवळपास दूध संकलन व्हायचे, त्यानंतर वाढ होत गेली आणि आजच्या घडीला त्यांच्याकडे सकाळी 600 लिटर दूध आणि संध्याकाळी 600 असे एकूण बाराशे ते तेराशे लिटर दुधाचे दररोज संकलन होते. यामधून ते महिन्याला लाखोंची उलाढाल करतात.
Last Updated: Jan 05, 2026, 17:08 IST11 जानेवारीला शिवतिर्थावर ठाकरे बंधूंची सभा होणार आहे. त्या सभेच निमंत्रण सगळ्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिले आहे. राज ठाकरे म्हणाले, "निमंत्रण द्यायला आलोय". पण ठाकरे बंधू त्यादिवशी काय बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Last Updated: Jan 06, 2026, 21:13 ISTशनिशिंगणापूर रोडवर टेंपो ट्रॅवलर आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. त्यात पाच जणांचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Last Updated: Jan 06, 2026, 21:03 ISTराज्यात बिनविरोध निवडणुकीवरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची जुंपली आहे. विरोधी पक्षाने थेट कोर्टाचे दार ठोठावले आहे. त्यातच महायुती सरकार त्यांच्या विजयाचे सेलिब्रेशन करत आहे. विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे.
Last Updated: Jan 06, 2026, 20:44 ISTमनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला.त्यानंतर आज भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल केला.राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटले.
Last Updated: Jan 06, 2026, 20:29 ISTछत्रपती संभाजीनगर : वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या गोष्टी फॉलो करत असतात. काहीजण भात खाणे टाळतात तर काही लोक खूपच व्यायाम करतात. पण तरी देखील वजन कमी होत नसल्याने कंटाळून डाएटिंगकडे वळतात. सध्या भारतात वजन कमी करण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंग हा प्रकार खूपच लोकप्रिय झाला आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांनी डाएटिंगची ही पद्धत निवडली आहे. पण हे केल्यामुळे खरंच फायदा होतो का? याविषयी आपल्याला आहार तज्ज्ञ रसिका देशमुख यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: Jan 06, 2026, 20:22 IST