TRENDING:

ठाणे पालिकेत शिवसेनेचे 4 उमेदवारांची बिनविरोध निवड, VIDEO

ठाणे

ठाणे पालिकेमध्ये 4 शिवसेना उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे विरोधकांना मोठी चिंता निर्माण झाली आहे. प्रचाराच्या आधीच बिनविरोध उमेदवार निवडूण आले आहेत. त्यात प्रभाग क्र.17 अ एकता भोईर, प्रभाग क्र.18 ब जयश्री रविंद्र फाटक, प्रभाग क्र.18 क सुखदेव मोरे, राम रेपाळे प्रभाग क्र.18 ड हे विजयी झाले आहेत.

Last Updated: Jan 02, 2026, 16:33 IST
Advertisement

सोलापुरात अर्ज माघारी घेताना भाजप उमेदवारांचा राडा, नंतर पोलिसांसोबत बाचाबाची, VIDEO

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता.राज्यात अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला. त्यातच आता सोलापुरात अर्ज मागे घेताना भाजप उमेदवाराची पेलिसांसोबत बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला आहे. राजू पाटील आणि सुरेश पाटील यांच्या समर्थकांमध्ये हुज्जत झाली.

Last Updated: Jan 02, 2026, 17:17 IST

नाशिकमध्ये भाजपच्या 2 उमेदवारांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी, VIDEO

राज्यात निवडणुकीच्या वातावरणात अनेक ठिकाणी काही ना काही घटना घडताना दिसत आहेत. नाशिकमध्ये अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी जोरदार राडा झाला आहे. भाजपचे अधिकृत आणि बंडखोर उमेदवाराच्या पतीमध्ये राडा झाल्याची घटना घडली आहे. देवानंद बिरारी आणि बाळा शिरसाट या दोन उमेदवारांमध्ये नाशिकमध्ये हाणामारी झाली आहे.

Last Updated: Jan 02, 2026, 16:13 IST
Advertisement

कमांडर बारसे देवासह 17 माओवाद्यांनी केलं आत्मसमर्पण, VIDEO

देश

तेलंगणामध्ये पोलिसांसमोर माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. पीपल्स लिबरेसन गोरीला आर्मी बटालयीन माओवादीचा मुख्य कमांडर बारसे देवा आहे. यासाठी 3 कोटींचं बक्षीस ठेवण्यात आले होते. यांच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी संघटनांची आशा मावळली आहे.

Last Updated: Jan 02, 2026, 15:59 IST

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नवनिर्वाचित नगरसेवकांचं अभिनंदन अन् विरोधकांना चपराक, VIDEO

साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नवनिर्वाचित नगरसेवकांचं अभिनंदन करण्यात आले. तेव्हा ते म्हणाले,"सातारा जिल्ह्यामध्ये इतकं प्रचंड यश हे भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदाच प्राप्त झालं आहे. या सातारा जिल्ह्याने इतर सगळ्या पक्षाला भूईसपाटच केले आहे. अशा प्रकारची निवडणुक या आधी कधीच पाहायला मिळाली नाही."

Last Updated: Jan 02, 2026, 15:41 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/ठाणे/
ठाणे पालिकेत शिवसेनेचे 4 उमेदवारांची बिनविरोध निवड, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल