TRENDING:

एका छोट्याशा चुकीमुळे शिवसेना नेत्याच्या मुलीचा वाढदिवशीच मृत्यू; तुम्हीही नकळत तेच करताय

Last Updated:
Shivsena Leader Daughter Death : शिवसेना नेते दीपक कंबोज यांची मुलगी मुनमुन हिचा वाढदिवशीच तिचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यूचं कारण ठरली ती एक चूक. अशी चूक जी नकळतपणे अनेक जण करत आहेत. कदाचित तुम्हीही करत आहात. त्यामुळे आज मुनमुनच्या मृत्यूचं कारण ठरलेली ही चूक उद्या तुमचाही जीव घेऊ शकते. त्यामुळे आम्ही तुम्हाला त्याबाबत सावध करत आहोत. 
advertisement
1/5
छोटीशी चूक, शिवसेना नेत्याच्या मुलीचा वाढदिवशीच मृत्यू; तुम्हीही नकळत तेच करताय
दीपक कंबोज हे पंजाबच्या जालंधरचे शिवसेना नेते. त्यांची मुलगी मुनमुन जिचा वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारीला वाढदिवस असल्याने घरात त्याची जोरदार तयारी सुरू होती. मुनमुन अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली, ती बाहेर आलीच नाही. बराच वेळ अंघोळीसाठी मुनमुन बाहेर न आल्याने घरच्यांनी दरवाजा वाजवला मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी बेशुद्ध पडलेल्या मुनमुनला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.
advertisement
2/5
मुनमुनच्या मृत्यूचं कारण होता तो बाथरूममधील गीझर. तिने शॉवरसाठी गीझर सुरू केला त्यावेळी गीझरच्या पाईपमधून गॅस पाईप लीक झाला. गॅस लीक झाल्याने बाथरुममध्येच तिचा श्वास गुदमरला आणि जीव गेला.
advertisement
3/5
गीझर जो अंघोळीला गरम पाण्यासाठी वापरला जातो. हिवाळ्यात तर याचा हमखास वापर होतो. कित्येक घरांमध्ये गीझर आहेत. पण हाच गीझर जीवघेणा ठरू शकतो.
advertisement
4/5
तज्ज्ञांच्या मते, असे अपघात सहसा कार्बन मोनोऑक्साइडमुळे होतात. हा वायू रंगहीन आणि गंधहीन असतो, ज्यामुळे तो लोकांना दिसत नाही. हवेशीर आणि बंद जागेत हा वायू वेगाने पसरतो आणि काही मिनिटांतच प्राणघातक ठरू शकतो.
advertisement
5/5
त्यामुळे गॅस गीझर वापरताना काही खबरदारी घेणं खूप महत्त्वाचं आहे. पूर्णपणे बंद बाथरूममध्ये कधीही गॅस गीझर बसवू नका, बाथरूममध्ये खिडकी किंवा एक्झॉस्ट फॅन असावा. आंघोळीपूर्वी पाणी गरम करा आणि नंतर गीझर बंद करा. बाथरूमच्या बाहेर हवेशीर जागेत गीझर बसवणं अधिक सुरक्षित आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
एका छोट्याशा चुकीमुळे शिवसेना नेत्याच्या मुलीचा वाढदिवशीच मृत्यू; तुम्हीही नकळत तेच करताय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल