
भंडारा जिल्ह्यात कोरंभी परिसरात एका पट्टेरी वाघांच दर्शन घडंलं आहे. काही नागरिक गोसेखुर्द धरणाकडे जात असताना त्यांना हा वाघ दिसला. त्यांनी प्रसंगावधानाने त्या वाघाचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.
Last Updated: Dec 29, 2025, 18:23 ISTठाकरे बंधूंची युती झाल्यावर मनसेचा पहिलाच मेळावा पार पडला. तेव्हा राज ठाकरेंनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी मुंबई महत्वाची आहे, त्यामुळे आपल्याला मुंबई वाचवायची आहे.निवडणुकीला एकजुटीनं सामोरं जा, मुंबई वाचली पाहिजे, त्यासाठी संकटं नीट ओळखा."
Last Updated: Dec 29, 2025, 20:29 ISTमहानगर पालिकेच्या निवडणूकीत राज्यात धमाल पाहायला मिळते आहे. पण कोण कोणासोबत आहे तेच समजत नाही. महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन प्रमुख घटक पक्ष आहेत. महायुतीत सत्ताधारी आणि महाविकास आघाडीत विरोधक आहेत. हे एकमेकांच्या विरोधात लढतील असे वाटले. पण राज्यात अभद्र युती आणि आघाडीचं पेव फुटलं आहे. जास्तीत जास्त जागा लढवायला मिळव्यात म्हणून सोयीची सोयरीक करताना पाहायला मिळते आहे.
Last Updated: Dec 29, 2025, 20:18 ISTछत्रपती संभाजीनगर : शाकाहार की मांसाहार यावरून जशी मतमतांतरं असतात. अगदी तशीच चिकन खावं की मटन यावरून देखील दिसतात. मांसाहारी लोकांमध्ये देखील काही चिकन प्रेमी असतात तर काहींना फक्त मटन आवडतं. त्यामुळे चिकन चांगलं की मटन हा प्रश्नही अनेकांना पडतो. तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ रसिका देशमुख यांनी दिलं आहे.
Last Updated: Dec 29, 2025, 20:13 ISTराज्यात पक्षापक्षांमध्ये सगळीकडेच नाराजी पाहायला मिळत आहे. मातोश्रीवर काल झालेल्या शिवसेना उबाठाच्या बैठकीत अनिल परब आणि वरुन सरदेसाई यांच्यात जागावाटपावरुन खडाजंगी झाल्याचे समजते आहे. हा वाद इतका विकोपाला गेला की अनिल परब या बैठकीतून उठून गेले.
Last Updated: Dec 29, 2025, 20:01 ISTशिंदे शिवसेना नेते संजय सिरसाट यांनी ठाकरे बंधूवर घणाघात केला आहे. ते टीका करताना म्हणाले, "काहीही बोला मतदार तुमच्या बाजूने येणार नाहीत.तुमची शक्ती कमी झाली हे मान्य करा."
Last Updated: Dec 29, 2025, 19:39 IST