तणाव कमी करण्यास तयार
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. पाकिस्तान भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी तयार आहे. जर भारताने सकारात्मक आणि नरम भूमिका घेतली तर पाकिस्तान निश्चितपणे तणाव संपवण्यासाठी पुढे येईल. ख्वाजा आसिफ यांचे हे वक्तव्य भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या मिसाइल हल्ल्याच्या काही तासांनंतर आले आहे. यावरून या हल्ल्याचा पाकिस्तानवर मोठा परिणाम झाल्याचे स्पष्ट होते.
advertisement
पाकिस्तानमधून आली मोठी बातमी, ऑपरेशन सिंदूरच्या 12 तासानंतर म्हणाले...
ख्वाजा आसिफ यांनी काय म्हटले?
ब्लूमबर्ग टेलिव्हिजनने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, पाकिस्तान केवळ तेव्हाच प्रत्युत्तर देईल जेव्हा त्यांच्यावर हल्ला होईल. आसिफ म्हणाले, आम्ही गेल्या पंधरा दिवसांपासून सतत सांगत आहोत की आम्ही भारताच्या विरोधात कोणतीही शत्रुतापूर्ण कारवाई सुरू करणार नाही. पण जर आमच्यावर हल्ला झाला. तर आम्ही नक्कीच त्याचे उत्तर देऊ. जर भारताने नरमाईची भूमिका घेतली तर आम्ही निश्चितपणे हा तणाव संपवू.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तान पुरता बॅकफूटवर गेला असल्याचे या विधानांवरून स्पष्ट होते. पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने दाखवलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानला आता शांततेची भाषा बोलणे भाग पडले आहे. आता भारत यावर काय प्रतिक्रिया देतो आणि दोन्ही देशांमधील तणाव खरोखरच कमी होतो का, हे पाहणे महत्त्वाचे असेल.
