पाकिस्तानमधून आली मोठी बातमी, ऑपरेशन सिंदूरच्या 12 तासानंतर म्हणाले- भारताविरुद्ध युद्ध करण्याची...
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
India Air Strike: पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. यानंतर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेतली आहे.
इस्लामाबाद: भारताने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या अवघ्या 16 दिवसांत पाकिस्तानमध्ये घुसून जोरदार हवाई हल्ला केला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आलेल्या या कारवाईत भारतीय जवानांनी अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. या हल्ल्यामुळे पाकिस्तान पुरता हादरला असून दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 25 भारतीय जवान आणि एका नेपाळी नागरिकाला वीरमरण आले होते.
दरम्यान भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) दार ठोठावले आहे. पाकिस्तानने यूएनएससीला एक औपचारिक नोटीस पाठवली आहे. ज्यात म्हटले आहे की पाकिस्तानला भारतासोबत युद्ध करण्याची कोणतीही इच्छा नाही. मात्र जर त्यांच्या सार्वभौमत्वावर कोणताही धोका किंवा हल्ला झाला. तर त्यांना प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 'नो टेक-ऑफ, नो लँडिंग'; 7 तास बंद राहणार
यूएनएससीला पाठवलेल्या पत्रात पाकिस्तानने भारतावर ‘आक्रमक कारवाई’ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय समुदायाला या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे की, जर त्यांच्या सीमांचे उल्लंघन झाले किंवा त्यांच्यावर हल्ला झाला, तर ते आपल्या नागरिकांचे आणि क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत.
advertisement
IND vs PAK युद्ध झाल्यास एका दिवसासाठी किती खर्च येईल? धडकी भरवणारा आकडा
पाकिस्तानने हे देखील स्पष्ट केले आहे की त्यांना युद्ध नको आहे. परंतु जर त्यांच्या शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण झाला, तर ते शांत बसणार नाहीत. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, पाकिस्तान चर्चेच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण करू इच्छितो. परंतु राष्ट्रीय हितांचे रक्षण करणे त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पाकिस्तान आपले मत जागतिक स्तरावर सातत्याने मांडत राहील आणि आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांची बाजू निष्पक्षपणे ऐकेल अशी त्यांना अपेक्षा आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांना या प्रदेशात शांतता राखण्यासाठी आणि संघर्ष टाळण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून अद्याप या नोटीसवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र जगभरातील लोक भारत आणि पाकिस्तानमधील ताज्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. अनेक देशांनी दोन्ही बाजूंना संयम राखण्याचे आणि तणाव वाढवणारे कोणतेही पाऊल न उचलण्याचे आवाहन केले आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 07, 2025 2:35 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
पाकिस्तानमधून आली मोठी बातमी, ऑपरेशन सिंदूरच्या 12 तासानंतर म्हणाले- भारताविरुद्ध युद्ध करण्याची...


