TRENDING:

अमेरिकेतील निवडणुकीचा भारतीय Share Market वर होणार परिणाम, पण कसा?

Last Updated:

हॅरिस जिंकल्यास व्याज दर कमी होण्याची शक्यता आहे. तसेच इतर देशांच्या तुलनेत डॉलर स्थिर राहील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. उपराष्ट्रपती कमला हॅरिस व माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत होत आहे. या दोघांपैकी कोणाची पार्टी निवडणूक जिंकणार हे लवकरच कळेल. मात्र, अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदी हॅरिस की ट्रम्प यांच्यापैकी कोण विराजमान झाल्यास भारतासाठी फायद्याचं ठरेल, ते जाणून घेऊयात.
News18
News18
advertisement

जाणकारांच्या मते, अमेरिकेत ट्रम्प सत्तेत आल्यास भारताच्या शेअर मार्केटवर व चलनावर व्यापक परिणाम दिसू शकतात. मात्र, डेमोक्रॅटिक पार्टीच्या कमला हॅरिस आल्यास जास्त परिणाम होणार नाहीत. आयसीआयसीआय बँकेचे समीर नारंग म्हणाले की ट्रम्प राष्ट्रपती झाल्यास व्याज दर, सोन्याच्या किमती, डॉलरच्या किमतीत जास्त वाढ होईल तर क्रूड ऑईलच्या दरांत घसरण होईल. हॅरिस जिंकल्यास व्याज दर कमी होण्याची शक्यता आहे. तसेच इतर देशांच्या तुलनेत डॉलर स्थिर राहील.

advertisement

ट्रम्प जिंकल्यास भारतावर काय होणार परिणाम?

ट्रम्प निवडणूक जिंकल्यास त्यांच्या कठोर ट्रेड पॉलिसीज अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करू शकतात. त्याचा परिणाम वॉल स्ट्रीटवर होताना दिसेल. परिणामी, अमेरिकेच्या शेअर बाजाराची कामगिरी जगातील सर्वांत चांगली होऊ शकते. या परिस्थितीत यील्डमध्ये वाढ दिसू शकते. गुंतवणुकदारांना सप्लाय वाढण्याच्या अपेक्षेने लाँग टर्म सिक्युरिटीजमध्ये चांगला परतावा मिळू शकतो.

advertisement

आयसीआयसीआय बँकेच्या विश्लेषकांच्या मते, ट्रम्प सत्तेत आल्यास डॉलर मजबूत होऊ शकतो. ब्रेंट क्रूड ऑईलच्या किमतीत घसरण होऊ शकते. सोन्याचे दर वाढू शकतील. तर बेंट मेटलमध्ये घसरण होऊ शकते, त्याचा परिणाम चीनच्या विकासावर होऊ शकतो. तसेच 10 वर्षांच्या अमेरिकी बाँड यील्डचा परतावा 4.40-4.50 टक्क्यांवर येऊ शकतो. दुसरीकडे डॉलर इंडेक्स 105-106च्या रेंजमध्ये दिसू शकते. ट्रम्प जिंकल्यास डिसेंबरपर्यंत डॉलर इंडेक्स 106.50 च्या पातळीवर जाऊ शकतो.

advertisement

नोमुराच्या विश्लेषकांच्या मते, भारत बहुतांश डोमेस्टिक ड्रिव्हन इकॉनॉमी असल्याने अमेरिकेच्या स्लो ग्रोथचा भारतावर फार नकारात्मक परिणाम होणार नाही. भारताला क्रूड ऑईलच्या दरांतील कपात व मंदावत्या अर्थव्यवस्थेचा फायदा होईल. तसेच जीवाश्म इंधनाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घट होईल. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याचा बीपीसीएल, आयओसीएल आणि एचपीसीएल या भारतीय ऑईल मार्केटिंग कंपन्यांना फायदा होईल. मात्र ओएनजीसी, ऑईल इंडिया आणि गेलवर नकारात्मक परिणाम होतील.

advertisement

हॅरिस जिंकल्यास भारतावर काय होणार परिणाम?

हॅरिस निवडणूक जिंकल्यास जागतिक व अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर फार परिणाम होणार नाही. तसेच अमेरिका हळूहळू आर्थिकदृष्ट्या स्थिरावण्यात यशस्वी होईल, अशी अपेक्षा असेल. आयसीआयसीआय बँकेच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, इक्विटी मार्केट, ऊर्जेच्या किमती, सोन्याच्या किमती, बेस मेटलच्या किमती आणि डॉलर इंडेक्स सपाट दिसू शकतील.

बँकेच्या रिपोर्टनुसार, हॅरिस राष्ट्रपती झाल्यास डिसेंबर 2024 पर्यंत 10 वर्षांचे अमेरिकन बाँड 4-4.10 टक्क्यांच्या रेंजमध्ये दिसू शकतात. तर डॉलर इंडेक्स 101.50-103.50 च्या रेंजमध्ये ट्रेडिंग करताना दिसू शकतील. तसेच जागतिक वस्तूंच्या किमती सपाट राहण्याची शक्यता आहे.

डेमोक्रॅट जिंकल्यास अमेरिकेला होणारी निर्यात ही भारतासाठी फायद्याची बाब असेल, कारण बायडन यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या चार वर्षांत अमेरिकेतील भारतीय निर्यातीत वाढ झाली. हॅरिस हाय स्किल्ड स्थलांतरितांना अमेरिकेत काम करणं सोपं करणाऱ्या पॉलिसीचे समर्थन करू शकतात, ज्याचा आयटी सेक्टरला फायदा होईल, असं फिलीप कॅपिटलने म्हटलंय.

शेअर मार्केटसाठी कोण फायद्याचं?

बुश यांच्या काळात डाऊ जोन्समध्ये 28 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली होती. बराक यांच्या कारकिर्दीत याच इंडेक्समध्ये 78 टक्के तेजी आली होती. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यावर डाऊ जोन्समध्ये 54 टक्के वाढ झाली होती. बायडन यांच्या दुसऱ्या कार्यकाळात जवळपास 41 टक्के तेजी पाहायला मिळाली होती.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

भारतीय मार्केटबद्दल बोलायचं झाल्यास, बुश यांच्या काळात मनमोहनसिंग भारताचे पंतप्रधान होते. ओबामा यांच्या कार्यकाळात भारतीय शेअर मार्केट 55 टक्क्यांनी वाढले होते. तर, ट्रम्प यांच्या काळात शेअर बाजारात 63 टक्के तेजी आली होती. आता बायडेन यांच्या काळात मार्केटमध्ये 89 टक्के तेजी दिसून आली. ऑक्टोबर महिन्यात भारतीय शेअर बाजार मोठ्या प्रमाणात गडगडला;पण आता दिवाळीनंतर तो हळूहळू सावरतो आह. अमेरिकेतील निवडणुकीचा निकाल या महिन्यात लागेल त्यानंतर बाजारात तेजी आली तर सामान्य गुंतवणूकदार आनंदी होतील.

मराठी बातम्या/विदेश/
अमेरिकेतील निवडणुकीचा भारतीय Share Market वर होणार परिणाम, पण कसा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल