TRENDING:

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकले म्हणून काही महिलांनी केलं टक्कल, तर काही जाणार 'सेक्स स्ट्राइक'वर

Last Updated:

अमेरिकेत राष्ट्रपतिपदी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा विजयी झाल्यामुळे महिलांच्या प्रजननासंदर्भातल्या आणि अन्य संरक्षणविषयक हक्कांवर निर्बंध येण्याची भीती व्यक्त होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक ठिकाणी राग व्यक्त होत आहे. काही महिलांनी ट्रम्प यांच्या विजयाबद्दल खेद आणि नाराजी व्यक्त करण्यासाठी आंदोलनाचा अनोखा मार्ग निवडला आहे. अनेक महिलांनी सेक्स स्ट्राइकवर (शरीरसंबंधांचा संप) जाण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या विजयामुळे महिलांचे संरक्षण आणि गर्भपातविषयक हक्कांवर काही परिणाम होण्याच्या शक्यतेच्या भीतीने महिलांनी या आंदोलनाची घोषणा केली असल्याचं वृत्त 'द टेलिग्राफ'ने दिलं आहे. या आंदोलनाची प्रेरणा कोरिअन फेमिनिस्ट '4B मूव्हमेंट'वरून घेण्यात आली आहे. लैंगिक संतुलनाच्या नव्या व्याख्येसाठी पुरुषांशी सेक्स न करणं अशी ही चळवळ असते.
News18
News18
advertisement

फोर बी मूव्हमेंट दक्षिण कोरियात 2019 साली सुरू झाली. पितृसत्ताक पद्धतीशी लढण्यासाठी तिथल्या महिलांनी हा नवा दृष्टिकोन अंगीकारला. त्या माध्यमातून त्या हेटेरोसेक्शुअल रिलेशनशिप्समध्ये सहभागी होत नाहीत. त्यात चार गोष्टींचा समावेश असतो. पुरुषांशी सेक्स नाही (bisekseu), डेटिंग नाही (biyeonae), विवाह नाही (bihon) आणि पुरुषांकडून मूल होऊ द्यायचं नाही (bichulsan) या त्या चार गोष्टी आहेत. त्यालाच फोर बी मूव्हमेंट असं म्हणतात. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पुढची चार वर्षं सत्तेवर असतील, तोपर्यंत अशी चळवळ राबवण्याचं या महिलांनी म्हटलं आहे.

advertisement

लैंगिक असमानता आणि त्याआधारे होणाऱ्या हिंसेच्या निषेधार्थ दक्षिण कोरियात फोर बी चळवळ सुरू झाली. या चळवळीमुळे देशाचा जन्मदर हळूहळू कमी होऊ लागेल आणि लोकसंख्या हळूहळू कमी होऊ लागेल. सोशल मीडियातून ही चळवळ वणव्यासारखी पसरली. त्यामुळे महिलांनी पुरुषांशी रोमँटिक नातेसंबंध नाकारायचं ठरवलं.

अमेरिकेत राष्ट्रपतिपदी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा विजयी झाल्यामुळे महिलांच्या प्रजननासंदर्भातल्या आणि अन्य संरक्षणविषयक हक्कांवर निर्बंध येण्याची भीती व्यक्त होत आहे. विद्यमान उपराष्ट्रपती आणि ट्रम्प यांच्याविरुद्ध निवडणुकीला उभ्या राहिलेला कमला हॅरिस यांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या मोहिमेत असा आरोप केला होता, की ट्रम्प महिलांवर निर्बंध घालू इच्छितात, गर्भपात पूर्णपणे रद्द करू इच्छितात. ट्रम्प यांनी वेळोवेळी महिलांवर अश्लाघ्य टिप्पणी केल्याचे प्रसंगही घडले आहेत.

advertisement

कमला हॅरिस यांचा ट्रम्प यांच्याकडून पराभव झाला, तेव्हा अनेकांनी हा निकाल लैंगिकतेमुळे लागल्याची टिप्पणी केली आणि महिला राष्ट्रपती मिळण्यासाठी अमेरिका अद्याप तयार नसल्याचं मत व्यक्त झालं. 'पुरुष कायमच महिलांच्या विरोधात असतील,' अशी कॅप्शन असलेला कारमधल्या तरुण महिलेचा फोटो टिकटॉकवर शेअर झाला. त्यातून महिलांना फोर बी चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं. राष्ट्रपती होण्यासाठी पुरुषांइतक्याच महिलाही सक्षम आहेत, असं मतही व्यक्त झालं.

advertisement

अमेरिकेत झालेल्या निवडणुकीत झालेल्या मतदानामध्ये असं दिसून आलं, की 55 टक्के पुरुषांनी ट्रम्प यांना, तर 53 टक्के महिलांनी कमला हॅरिस यांना मतदान केलं. ट्रम्प निवडून आल्यावर महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्वतःच्या शरीरावर स्वतःचा सार्वभौम अधिकार कायम राहावा, म्हणून पुरुषांशी सेक्स स्ट्राइक करण्याचा निर्णय अनेकींनी घेतला आहे.

एक्सवर अनेक महिलांनी 4 बी मूव्हमेंटमध्ये सहभागी होत असल्याबद्दल आणि या मूव्हमेंटच्या समर्थनार्थ पोस्ट्स केल्या आहेत. 'आपली गर्भाशयं पुरुषांसाठी बंद करण्याची वेळ आली आहे. या निवडणुकीने हे सिद्ध केलं आहे, की ते आपला तिरस्कार करतात आणि अभिमानाने तिरस्कार करतात. त्यांना रिवॉर्ड देऊ नका,' असं एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

'फोर बी मूव्हमेंट ही केवळ पुरुषांना टाळण्यापुरती मर्यादित नाही, तर ही चळवळ म्हणजे महिलांमध्ये गुंतवणूक करणं आणि त्यांना पाठिंबा देणं होय. महिलांशी रिलेशनशिपमध्ये राहा, महिलांकडून चालवले जाणारे बिझनेस, मीडिया पाहा आणि वापरा. स्वतःभोवती केवळ महिला आणि त्यांची संस्कृतीच असू द्या,' अशी पोस्ट अन्य एका महिलेने केली आहे.

काहींनी यापुढचं पाऊल टाकून एकत्रितपणे हिस्टरेक्टॉमी (महिलेचे प्रजननाशी संबंधित अवयव काढून टाकण्याची शस्त्रक्रिया) करून घेऊ या, असं मत मांडलं आहे. काहींनी आपल्या रिपब्लिकल बॉयफ्रेंड्सशी ब्रेक-अप करायचं ठरवलं आहे, असं न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तात म्हटलं आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

एका महिलेने तर स्वतःचं डोकं ऑन कॅमेरा पूर्णपणे भादरून घेतलं आणि तो व्हिडिओ शेअर केला. अनेकांनी असंही मत व्यक्त केलं आहे, की अमेरिकेत अशी चळवळ कधीच चालू शकणार नाही.

मराठी बातम्या/विदेश/
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकले म्हणून काही महिलांनी केलं टक्कल, तर काही जाणार 'सेक्स स्ट्राइक'वर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल