पोलिसांनी असोसिएटेड प्रेसला सांगितलं की बँकॉकच्या चटुचक मार्केटजवळ असलेल्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू झालं आहे.
advertisement
सुरूवातीच्या वृत्तांनुसार अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि जर्मनीच्या जीएफझेड भूविज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार दुपारी हा भूकंप 10 किमी (6.2 मील) खोल आला, ज्याचं केंद्र शेजारी देश म्यानमार होतं. म्यानमार शहरातल्या मोनीवा शहरापासून जवळपास 50 किमी पूर्व भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. ग्रेटर बँकॉक भागाची लोकसंख्या 1 कोटी 70 लाख एवढी आहे, ज्यातले बहुतेक लोक हे उंच इमारतींमध्ये राहतात.
स्थानिक वेळेनुसार दीड वाजता भूकंप झाल्यानंतर इमारतींचे अलार्म वाजायला सुरूवात झाली, यानंतर दाट लोकसंख्या असलेल्या बँकॉकच्या उंच इमारती आणि हॉटेलमधून लोक बाहेर यायला लागली. हा भूकंप इतका भयंकर होता की इमारती आणि हॉटेलमधल्या स्विमिंग पूलमधील पाण्यातूनही लाटा उसळल्या.
भारतातही जाणवले धक्के
दरम्यान कोलकाता आणि आसपासच्या परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपामुळे शहरात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. कोलकात्याशिवाय मणिपूर आणि इंफाळच्या थांगल मार्केटमध्ये भीतीचं वातावरण पसरलं, कारण परिसरात अनेक जुन्या बहुमजली इमारती आहेत.
