ब्लॉक क्युबेकॉइसचे नेते यवेस फ्रान्स्वा ब्लँचेट यांनी घोषणा केली की, जस्टिन ट्रुडो यांचे मोजकेच दिवस राहिले आहेत. ट्रुडोंच्या सरकारने लिबरल पार्टिकडून ज्येष्ठ नागरीकांसाठी उतरत्या वयात सुरक्षा वाढवण्याची कऱण्यात आलेली मागणी फेटाळली होती. जस्टीन ट्रुडो यांना त्यांचे सरकार वाचवण्यासाठी न्यू डेमोक्रेटिक पार्टी आणि कंझर्वेटिव्ह पार्टीच्या समर्थनाची आवश्यकता आहे. यातच कंझर्वेटिव्ह पार्टीने आधीच निवडणुका घ्याव्या यासाठी दबाव टाकला आहे.
advertisement
सध्या ब्लॉक आणि एनडीपी यांनी मात्र कंझर्वेटिव्ह पार्टीकडून आधीच निवडणूक घेण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवलेला नाही. पण ब्लॉक पक्षाकडून प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रुडोंचे अस्तित्व खलिस्तान समर्थक पार्टीच्या समर्थनावर अवलंबून आहे. एडीपीने ट्रुडो यांच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. पण त्यांचे नेते जगमीत सिंह यांनी नुकतंच सांगितलं की, परिस्थिती पाहून पाठिंब्याचा निर्णय घेईन.
ट्रुडो यांच्या नेत्यांनी मात्र यातून मार्ग निघेल असं म्हटलंय. सार्वजनिक सेवा मंत्री जीन यवेस डुक्लोस यांनी म्हटलं की, ब्लॉकने दिलेला अल्टिमेटम हा कृत्रिम आहे. लिबरल अल्पसंख्यांक खासदारांना सोबत ठेवण्यासाठी आम्ही इतर पक्षांसोबत काम करणं सुरू ठेवू.
