मूळचे गुजरातचे असलेले काश पटेल यांचे आई-वडील युगांडात लहानाचे मोठे झाले. वडील १९७०च्या दशकात अमेरिकेला गेले. १९८० मध्ये काश पटेल यांचा जन्म न्यूयॉर्कच्या गार्डनर सिटीमध्ये झाला. काश हे वर्णभेदाविरोधात लढणारे म्हणून ओळखले जातात. त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलंय. याआधी ते ब्रिटन युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन फॅकल्टी ऑफ लॉज इथून इंटरनॅशनल लॉमध्ये प्रमाणपत्रही मिळवलंय. काश पटेल यांनी प्रभारी संरक्षण सचिव ख्रिस्तोपर मिलर यांचे माजी चीफ ऑफ स्टाफ म्हणूनही काम केलंय.याआधी राष्ट्राध्यक्षांचे उपसहाय्यक आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत वरिष्ठ संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे.
advertisement
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गेल्या कार्यकाळात काश पटेल यांना अनेक मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या होत्या. ISIS, अल-बगदादी आणि कासिम अल रिमी यांसारख्या अल कायदाच्या नेत्यांना संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलीय. यानंतरच काश पटेल हे ट्रम्प यांच्या नजरेत आले. ओलीस ठेवलेल्या, तुरुंगांमध्ये असलेल्या अमेरिकनांना मायदेशी आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय. त्यांनी इंटेलिजन्सवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ वकील म्हणूनही काम केलंय.
काश पटेल यांनी वकील म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. राज्य आणि संघीय न्यायालयात त्यांनी हत्या, नार्को-तस्करी यांसारख्या गुन्ह्यांचे खटले लढले. काश पटेल हे ट्रम्प यांच्यासाठी काहीही कऱण्यासाठी तयार असतात असं द अटलांटिक न्यूजने म्हटलंय. ट्रम्प यांनी त्यांच्या आधीच्या कार्यकाळात अखेरच्या आठवड्यांमध्ये पटेल यांना सीआयएच्या उपसंचालक पदी नियुक्त करण्याची योजना बनवली होती. पण त्यांना विरोध झाला होता. गेल्या वर्षी युवा रिपब्लिकनच्या एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी पटेल यांना म्हटलं होतं की, काश, तयार रहा.
