काय आहे 'बर्लिन मॉडेल' प्रस्ताव?
ट्रम्प यांचे दूत जनरल कीथ केलॉग यांनी सुचवले आहे की, युक्रेनला नियंत्रण क्षेत्रांमध्ये विभागले जाऊ शकते. या योजनेनुसार देशाच्या पश्चिम भागात ब्रिटिश आणि फ्रेंच सैनिक आश्वासन दल (assurance force) म्हणून तैनात असतील. तर पूर्व भागात रशियाचे सैन्य असेल. या दोन विभागांमध्ये युक्रेनचे सैन्य आणि एक नि:शस्त्र क्षेत्र (demilitarized zone) असेल असे त्यांनी म्हटले आहे. मात्र अमेरिका कोणतीही भूसेना (ground force) पाठवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
भारतीय कंपनीवर क्षेपणास्त्राने हल्ला; युक्रेनचा दावा, फोटो शेअर केल्याने खळबळ
जनरल केलॉग यांनी 'टाइम्स' वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही याला जवळपास तसेच बनवू शकता जसे दुसऱ्या महायुद्धानंतर बर्लिनसोबत झाले होते. जेव्हा तिथे एक रशियन क्षेत्र, एक फ्रेंच क्षेत्र आणि एक ब्रिटिश क्षेत्र होते. या धक्कादायक प्रस्तावावर युक्रेनची राजधानी कीवकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा
दुसरीकडे अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील चर्चेपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांना इशारा दिला. त्यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' प्लॅटफॉर्मवर म्हटले, रशियाला आता पुढे यावे लागेल. एका भयंकर आणि निरर्थक युद्धात दर आठवड्याला हजारो लोक मरत आहेत. हे युद्ध कधी व्हायलाच नको होते आणि जर मी राष्ट्राध्यक्ष असतो तर झालेही नसते.
भारताला संकटमोचकाकडून मिळणार ४ लाख कोटी, ट्रम्पचा टॅरिफ बॉम्ब ठरणार फुसका
सेंट पीटर्सबर्ग येथील प्रेसिडेंट लायब्ररीमध्ये चर्चेच्या सुरुवातीला पुतिन यांनी विटकॉफ यांचे स्वागत केल्याचे रशियन स्टेट टीव्हीवर दाखवण्यात आले. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल चार तासांहून अधिक काळ चर्चा चालल्याचे वृत्तसंस्थांनी नंतर सांगितले. क्रेमलिनने बैठकीनंतर दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, बैठकीचा विषय: युक्रेनियन तोडग्याचे विविध पैलू हा होता. रशियाचे गुंतवणूक दूत किरिल दिमित्रिएव यांनी ही चर्चा अर्थपूर्ण असल्याचे म्हटले आहे.