निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही प्रतिस्पर्धींचा पूर्ण फोकस हा ७ स्विंग स्टेट्सवर होता. या सातही राज्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली. कमला हॅरिस मागे पडल्या आहेत. फॉक्स न्यूजने डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्याचे वृत्त दिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष असतील. ट्रम्प यांनी जादुई आकडा गाठला आहे. तर कमला हॅरिस यांना २२५ इलेक्टोरल मते मिळवता आली. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी चुरशीच्या लढतीत बाजी मारली. ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील.
advertisement
कमला हॅरिस यांची कॅलिफोर्नियात कमाल
अमेरिकेतली १६ राज्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला. पण अमेरिकेचं उत्तर प्रदेश मानलं जाणाऱ्या कॅलिफोर्नियात त्यांना पराभवाचा धक्का बसला. कमला हॅरिस यांनी कॅलिफोर्निया जिंकून कमाल केली. पण त्यांना स्विंग स्टेट्समध्ये कमाल करता आली नाही. कॅलिफोर्नियात सर्वाधिक ५४ इलेक्टोरल मते आहेत. इथं विजय मिळवूनही कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकता आली नाही.
डोनाल्ड ट्रम्प हे १३१ वर्षांत पराभवानंतर पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकणारे पहिले माजी राष्ट्रपती ठरले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची ही निवडणूक ऐतिहासिक अशी ठरली. मात्र अमेरिकेच्या २३६ वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत एकदाही महिला राष्ट्राध्यक्ष होऊ शकलेली नाही. कमला हॅरिस यांना संधी होती पण त्यांच्या पराभवाने आता ही शक्यता मावळली.
