गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला हमासने सुपनोवा संगीत सोहळ्यात हल्ला केला होता. या हल्ल्यातून शिरेल गोलन ही २२ वर्षीय तरुणी वाचली होती. पण तिने रविवारी घरात आत्महत्या केली. शिरेलच्या कुटुंबियांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सरकारवर आरोप केले असून हल्ल्यात वाचलेल्या लोकांकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलंय.
शिरेलच्या भावाने म्हटलं की, हल्ल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. मित्रांपासून दूर राहत होती, कोणाला भेटत नव्हती. मी तिला तिची काळजी घेण्यास सांगितलं होतं. सगळं कुटुंब तिची काळजी घेत होतं पण तिची तब्येत बिघडत होती. इयाल म्हणाला की, हल्ल्यानंतर तिला दोन वेळा रुग्णालयात दाखल केलं होतं. पण तरीही सरकारकडून काही मदत मिळाली नाही. जर या प्रकरणात सरकारने मदत केली असती तर शिरेल जिवंत असती.
advertisement
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर शिरेल तिच्या मित्रांसोबत कशीबशी हल्ल्याच्या ठिकाणाहून बाहेर पडली. पण ती फार दूर जाऊ शकली नाही. त्यांनी कार सोडून एका झुडुपात आसरा घेतला. इस्रायल पोलिसांनी त्यांना वाचवलं होतं.
