आयएएनएस या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना 88 वर्षांचे मोबियस म्हणाले की, जग सध्या अशांतता आणि अस्थिरतेच्या टप्प्यातून जात आहे. खासकरून पश्चिम आशियातला संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्ध यांचं उदाहरण यासाठी घेता येईल. या पार्श्वभूमीवर शांतता प्रस्थापित करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम पंतप्रधान मोदी करू शकतात.
इमर्जिंग मार्केट्स फंडमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारं व्यक्तिमत्त्व म्हणून मार्क मोबियस यांची ओळख आहे. ते म्हणाले, 'पंतप्रधान मोदी हे महान नेते आहेत आणि महान व्यक्तीही आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या भूमिकेचं महत्त्व वाढू शकतं. कारण जागतिक पातळीवरच्या राजकीय परिस्थितीत सर्व बाजूंशी संवाद साधण्याची त्यांची क्षमता आहे. म्हणूनच पुढे जाऊन ते खूप महत्त्वाचे पीसमेकर म्हणजेच शांतता प्रस्थापित करणारे नेते होऊ शकतात.'मार्क मोबियस यांच्या मते मोदी हे खरोखरच कोणतीही गोष्ट करू शकतील, असे नेते आहेत आणि नोबेल शांतता पुरस्कारासाठी खरोखरच अत्यंत योग्य व्यक्ती आहेत.
advertisement
मोबियस यांनी सांगितलं, की 'सर्वांशी न्यूट्रल म्हणजे संतुलित आणि निष्पक्ष राहण्याची क्षमता भारताने दाखवून दिली आहे. जागतिक पातळीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करण्याच्या दृष्टीने भारत अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. आज जगातले एक महत्त्वाचे मध्यस्थ बनण्याच्या दृष्टीने मोदी यांच्याकडे उत्तम गुण आहेत.'
रशिया-युक्रेन संघर्षात न्यूट्रल म्हणून भारताकडे पाहिलं जात असतानाच पंतप्रधान मोदी यांनी सातत्याने शांततापूर्ण तोडग्यावर भर दिला आहे. त्यामुळे स्थिरतेला प्रोत्साहन देणारा देश अशी भारताची प्रतिमा अधिक दृढ झाली आहे. भारताचे युक्रेनशी राजनैतिक संबंध 1992मध्ये प्रस्थापित झाले. त्यानंतर यंदा ऑगस्टमध्ये युक्रेनला जाणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. युद्धप्रवण प्रदेशात शांततेला बळ आणि पाठिंबा देण्यामध्ये भारताचा सक्रिय सहभाग यावरून अधोरेखित होतो.
पंतप्रधान मोदी आणि तुमच्यामध्ये काय साम्य आहे, असा प्रश्न मोबियस यांना विचारला असता, 'पुढचा विचार करणं, मागे न पाहणं आणि जागतिक पातळीवर काय घडतं आहे त्याबद्दल अधिक आशावादी राहणं या बाबींमध्ये आपल्यात साम्य आहे,' असं मोबियस म्हणाले.
