IAEA च्या माहितीनुसार, इराणने फेब्रुवारी 2024 ते एप्रिल 2025 या कालावधीत 60 टक्के संवर्धित युरेनियमचा साठा 274.8 किलोवरून 408.6 किलोवर नेला आहे. म्हणजे तीन महिन्यांत इराणने साठ्यात सुमारे 50 टक्क्यांनी वाढ केली आहे.
पुतिन यांचा राग नियंत्रणाबाहेर, तयार केले किल झोन; Mission Anaconda सुरू
IAEA च्या मते, ही पातळी अण्वस्त्र निर्मितीसाठी अत्यंत जवळची आहे आणि दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळात या युरेनियमला 90 टक्के शुद्धतेच्या अण्वस्त्रयोग्य युरेनियममध्ये बदलता येऊ शकते. तेहरानचा दावा आहे की त्यांचा अणुऊर्जा कार्यक्रम पूर्णपणे शांततामूलक आहे. मात्र IAEA ने सांगितले आहे की ते हे निश्चित करू शकत नाहीत की इराणच्या अणुउर्जा संबंधित हालचाली फक्त नागरी वापरापुरत्याच मर्यादित आहेत. IAEA ने हेही नमूद केले आहे की इराण आवश्यक माहिती शेअर करत नाही आणि जुन्या अणुउपकरणांबाबत स्पष्ट माहिती देत नाही.
advertisement
इराण आणि अमेरिका यांच्यात आतापर्यंत पाच वेळा वाटाघाटी झाल्या आहेत. त्यांचा उद्देश एक नवीन अणुकरार करणे होता. मात्र इराणने अमेरिकेचा अलीकडील प्रस्ताव फेटाळून लावला असून तो गंभीर नसल्याचे म्हटले आहे. इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की जर त्यांच्या विरोधात पुन्हा निर्बंध लादले गेले, तर ते NPT (परमाणु अप्रसार संधी) करारातून बाहेर पडू शकतात.
भारताने केली लष्करी हालचाल, चीनची रात्री झोप उडाली; अशा ठिकाणी...
इस्रायलनेही या अहवालावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी चेतावणी दिली आहे की इराण अण्वस्त्राच्या अत्यंत जवळ पोहोचलेला आहे. त्यांनी म्हटले की आता केवळ निवेदन पुरेसे नाहीत, ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की त्यांनी इराणला एक स्पष्ट प्रस्ताव दिला आहे आणि तो प्रस्ताव स्वीकारणे इराणच्या हिताचे ठरेल.
IAEA चा हा अहवाल अशा वेळी समोर आला आहे जेव्हा जूनमध्ये होणाऱ्या बोर्ड बैठकीत इराणविरोधात एक संभाव्य प्रस्ताव मांडला जाऊ शकतो, ज्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय निर्बंध लागू होऊ शकतात.