कॅनडाने केलेल्या आरोपांनंतर भारताने आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावलं आणि कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना काढून टाकलं. निज्जर हत्याकांडाबद्दल कॅनडाने केलेल्या आरोपांविषयीचे पुरावे भारत वारंवार मागत आहे; मात्र कॅनडाने अद्याप पुरावे दिलेले नाहीत. केवळ निवडणुकीसाठी फायद्याकरिता जस्टिन ट्रूडो अशी वक्तव्यं करत आहेत. त्यांची डाळ शिजली नाही, तेव्हा कॅनडा सरकारने भारत-कॅनडा वादामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगला आणलं. जगातला एवढ्या मोठ्या आणि ताकदवान देशाच्याही लॉरेन्स बिश्नोई गँगने नाकी नऊ आणले आहेत. कॅनडा सरकारने लाजिरवाणी कबुली दिली आहे. कॅनडाचं म्हणणं आहे, की लॉरेन्स बिश्नोई गँगने त्याच्या नाकी नऊ आणले आहेत.
advertisement
भारताने कॅनडातून आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावल्यानंतर काही काळातच रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी (आरसीएमपी) भारतावर असा आरोप केला, की कॅनडातल्या गंभीर गुन्ह्यामध्ये भारताचा थेट सहभाग आहे. ओटावामध्ये भारत सरकारचे एजंट कथितरीत्या खलिस्तानी घटकांना लक्ष्य करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत काम करत आहेत, असा आरोपही आरसीएमपीकडून करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची नुकतीच मुंबईत हत्या झाली. त्या हत्येशी संबंध असल्याच्या संशयावरून सध्या लॉरेन्स बिश्नोई गँग चर्चेत आहे. त्या पार्श्वभूमीवर कॅनडाने हे आरोप केले आहेत.
भारतीय एजंट्सकडून शीख समुदायाच्या व्यक्तींनी लक्ष्य केलं जात आहे का, असा प्रश्न विचारला असता आरसीएमपीचे असिस्टंट कमिशनर ब्रिगिट गौविन यांनी सांगितलं, की भारतीय एजंट लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत काम करतात. कॅनडाने आरोपांमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव घेतलं आहे आणि असं म्हटलं आहे, की कॅनडात असलेले भारतीय एजंट्स लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत मिळून खलिस्तान समर्थकांना लक्ष्य करत आहेत; मात्र या आरोपाविषयीचा पुरावाही कॅनडाकडे नाही.
आरसीएमपीचे असिस्टंट कमिशनर ब्रिगिट गौविन यांनी सांगितलं, की 'भारताकडून दक्षिण आशियाई समुदायाला लक्ष्य केलं जात आहे; मात्र खासकरून ते कॅनडात खलिस्तान समर्थक घटकांना लक्ष्य करत आहेत. आम्ही आरसीएमपीच्या नजरेतून जे काही पाहिलं आहे, ते असं आहे, की ते संघटित गुन्हेगारांचा वापर करत आहेत. खासकरून बिश्नोई गँगने सार्वजनिकरीत्या याची जबाबदारी घेतली आहे. आम्हाला असं वाटतं, की ही गँग भारत सरकारच्या एजंटशी संलग्न आहे.'
