पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील कामरा एअरबेसला भेट दिली. त्यावेळी त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. त्यांनी म्हटलं की, "पाकिस्तान शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताशी चर्चा करण्यास तयार आहे." मात्र, त्यांनी एक अटही स्पष्टपणे मांडली. भारतासोबतच्या चर्चेत काश्मीर मुद्दा चर्चेच्या अजेंड्यावर असावा, अशी अट त्यांनी ठेवली आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाहलगामच्या जंगलात लपून बसलेल्या पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांवर निर्णायक कारवाई केली आहे. या कारवाईत काही दहशतवादी ठार झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या ऑपरेशनमध्ये ज्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला, त्यांचं थेट कनेक्शन पाकिस्तानमधील गुप्तहेर संस्था आयएसआयशी आहे, असा संशय आहे.
advertisement
शहबाज शरीफ यांच्या या वक्तव्यावर भारताकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, भारताच्या पूर्वीच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानकडून दहशतवादाविरोधात ठोस पावले उचलल्याशिवाय कोणतीही चर्चा होणे कठीण आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध 2019 मध्ये भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर अधिक तणावपूर्ण झाले आहेत. भारताने जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश बनवले. त्यावर पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.