TRENDING:

इराण युद्ध ट्रम्प यांच्या अंगलट, मदतीसाठी पसरले मित्र देशांकडे हात, तरी मदतीला येईना कुणी

Last Updated:

अमेरिका इस्त्रायलने इराणच्या सर्वोच्च नेत्याला लक्ष्य केल्यानंतर इराण कमकुवत होईल, असा कयास लावला जात होता. मात्र इराण जोरदार फाईट देत आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इराण विरुद्ध इस्त्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. अमेरिका इस्त्रायलने इराणच्या सर्वोच्च नेत्याला लक्ष्य केल्यानंतर इराण कमकुवत होईल, असा कयास लावला जात होता. मात्र, गेल्या काही आठवड्यांत इराणने ज्या पद्धतीने प्रत्त्युत्तर दिले आहे, त्याने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. इराणने केवळ अमेरिकेलाच नव्हे, तर आखाती राष्ट्रांमधील अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून, यामुळे युद्धाची धग वाढत चालली आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं देखील टेन्शन वाढलं आहे.
Donald Trump
Donald Trump
advertisement

खाडी देशांवर इराणचे भीषण हल्ले

मिळालेल्या अहवालानुसार, इराणने आधीच आपली क्षेपणास्त्रे सज्ज ठेवली होती. अमेरिकेने हल्ला करताच इराणने कतर, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि बहरीन यांसारख्या देशांवर हल्ले चढवले आहेत. या हल्ल्यांमुळे संपूर्ण पश्चिम आशियातील स्थिरता धोक्यात आली. इराणची लष्करी ताकद संपल्याचा दावा अमेरिका करत असली, तरी जमिनीवर इराण अद्यापही जोरदार प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं दिसून येत आहे.

advertisement

नाटो (NATO) आणि ट्रम्प यांच्यात जुंपली

या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या 'नाटो' मित्रराष्ट्रांवर तीव्र शब्दात टीका केली आहे. ट्रम्प यांनी नाटोला 'एकतर्फी व्यवस्था' असं संबोधलं आहे. "अमेरिका आपल्या मित्रराष्ट्रांच्या सुरक्षेवर अब्जावधी डॉलर्स खर्च करते, परंतु जेव्हा मदतीची खरी गरज असते, तेव्हा हे देश मागे हटतात," अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपला संताप व्यक्त केला.

advertisement

ट्रम्प यांनी ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या देशांना 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' हा महत्त्वाचा सागरी मार्ग खुला ठेवण्यासाठी आपली युद्धनौका आणि सैनिक तैनात करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, बहुतांश नाटो देशांनी या युद्धात थेट सामील होण्यास नकार दिला आहे. त्याऐवजी, अमेरिका आणि इराणने राजनैतिक मार्गाने वाद सोडवावा, असा सल्ला या देशांनी दिला आहे.

advertisement

मॅक्रॉन यांच्यावर वैयक्तिक टीका

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांद्याचे दर पुन्हा कोसळले, लिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

नाटो देशांच्या नकारामुळे चिडलेल्या ट्रम्प यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर वैयक्तिक हल्ला चढवला. "मॅक्रॉन लवकरच सत्तेतून बाहेर पडू शकतात," असे भाकीत वर्तवत ट्रम्प यांनी मित्रराष्ट्रांमधील दरी अधिक रुंदावली आहे. ट्रम्प यांचा दावा आहे की, इराणची हवाई दल आणि नौदल शक्ती पूर्णपणे नष्ट झाली आहे, मात्र इराणकडून होणारे सततचे क्षेपणास्त्र हल्ले अमेरिकेच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
इराण युद्ध ट्रम्प यांच्या अंगलट, मदतीसाठी पसरले मित्र देशांकडे हात, तरी मदतीला येईना कुणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल