इस्रायलकडून दक्षिण लेबनॉनमध्ये हल्ले केले जात आहेत. हिजबुल्लाचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतरही इस्रायलकडून दहशतवाद्यांचा शोध घेऊन टार्गेट केलं जात आहे. मंगळवारी सिडॉन शहराजवळ सराफंद आणि हैरद सईदा इथं हवाई हल्ले करण्यात आले. यात ७७ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. अल जजीराने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, मंगळवारी गाझात इस्रायलच्या हल्ल्यात किमान १४३ पॅलेस्टाइन नागरिक ठार झाले. यापैकी १३२ हे युद्धग्रस्त भाग असलेल्या ठिकाणी मारले गेले.
advertisement
लेबनॉनच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं की, मंगळवारी इस्रायलच्या हल्ल्यात किमान ७७ जणांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक मुले आणि महिलांचा समावेश होता. हे हल्ले साराफंदच्या दक्षिण शहरात झाले. तर गाझात चार इस्रायलचे सैनिक आणि लेबनॉनमध्ये एका सैनिकाचा मृत्यू झाला. ७ ऑक्टोबर २०२३ च्या हल्ल्यानंतर आतापर्यंत इस्रायलच्या ७७७ सैनिकांचा मृत्यू झालाय.
हिजबुल्लाने नुकताच हसन नसरल्लाहचा उत्तराधिकारी निवडला. अशावेळी लेबनॉनमध्ये इस्रायलने हल्ला केला. हिजबुल्लाने नसरल्लाह मारला गेल्यानंतर प्रमुख म्हणून शेख नईम कासिमला प्रमुख म्हणून निवडलं आहे. हिजबुल्लाहला विजय मिळेपर्यंत नसरल्लाच्या धोरणानुसार काम सुरू ठेवणार असल्याचा संकल्प कासिमने केला आहे. ७१ वर्षीय कासिम हा लेबनॉनवर इस्रायलच्या १९८२ च्या हल्ल्यानंतर स्थापन झालेल्या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे.
