इस्रायली सार्वजनिक ब्रॉडकास्टर 'कान'ला दिलेल्या मुलाखतीत नेतन्याहू म्हणाले, इस्लामी गणराज्यात सत्ताबदल हा सर्वप्रथम इराणी जनतेचा विषय आहे. याला कोणताही पर्याय नाही. त्यामुळे मी कधीच याला आमच्या उद्दिष्टांपैकी एक म्हणून सादर केलेलं नाही. हे हल्ल्याचे संभाव्य परिणाम असू शकतात. पण हा इस्रायलचा औपचारिक उद्देश नाही.
इस्रायली परराष्ट्रमंत्री गिदोन सार यांनीही याला दुजोरा दिला की सध्या इराणी शासन बदलण्याची कोणतीही अधिकृत इस्रायली धोरण नाही. मात्र जिथे नेतन्याहू आणि सार संयमित विधानं करत आहेत. तिथे इस्रायली संरक्षणमंत्री इसराइल कात्ज यांनी स्पष्ट मोर्चा उघडला आहे. त्यांनी म्हटलं की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना आता अधिक काळ जिवंत राहू द्यायचं नाही. त्यांचा दावा आहे की काही दिवसांपूर्वी तेल अवीवजवळील एका रुग्णालयावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामागे खामेनेई यांचाच हात होता. ज्यात डझनभर लोक जखमी झाले.
advertisement
खामेनेईंची हत्या अस्वीकार्य
दरम्यान रशियाने या संपूर्ण घडामोडीवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी स्काय न्यूजला सांगितलं, इराणमध्ये सत्ताबदलाच्या कल्पनाही अस्वीकार्य आहेत. आणि जर कोणी खामेनेई यांच्या हत्येचा विचार करत असेल, तर त्यांनी लक्षात घ्यावं की ते एक 'पेंडोरा बॉक्स' उघडत आहेत.
पेंडोरा बॉक्स ही ग्रीक मिथकांमधून आलेली एक म्हण आहे, याचा अर्थ असा निर्णय किंवा कृती जी एकदा सुरू झाली की, त्यातून अनेक अडचणी आणि संकटं एकामागोमाग बाहेर येतात. त्यांनी स्पष्ट केलं की, इराणमध्ये सत्ताबदल ही कल्पनाही अकल्पनीय आहे. ही गोष्ट अस्वीकार्य असलीच पाहिजे, इतकंच नाही तर याबद्दल बोलणं देखील सर्वांनाच अस्वीकार्य वाटायला हवं.
रशियाची इस्रायलला इशारा
पेस्कोव यांनी इशारा दिला- जर असं काही झालं, तर इराणच्या आतून जोरदार प्रतिक्रिया उमटेल आणि ती प्रतिक्रिया अत्यंत तीव्र असेल. यामुळे इराणमध्ये अतिरेकी भावना उफाळून येतील आणि जे लोक (खामेनेई यांच्या हत्या) याबद्दल बोलत आहेत, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे.
रशिया आणि इराण यांच्यात अनेक वर्षांपासून लष्करी आणि राजकीय संबंध आहेत. जे युक्रेन युद्धानंतर आणखी मजबूत झाले आहेत.
अशा परिस्थितीत रशियाचा हा इशारा इस्रायल आणि अमेरिका यांच्यासाठी एक महत्त्वाचा इशारा मानला जात आहे. स्वतः खामेनेई यांनी देखील अमेरिका आणि इस्रायल दोघांवर टीका करताना म्हटलं, जर अमेरिकेला यात उडी घ्यावी लागली, तर त्याचा स्पष्ट अर्थ असा होतो की इस्रायल अपयशी ठरला आहे. त्यांनी असंही म्हटले की, इस्रायली सरकारचा कमकुवतपणा त्याला इतरांच्या आधार घ्यायला लावतोय.
