IDFने म्हटलं की, इस्रायलवर इराणकडून सातत्याने हल्ले करण्यात येत होते. या हल्ल्यांना इस्रायलच्या सुरक्षा दलाने प्रत्युत्तर दिलंय. इराणच्या लष्करी तळांवर हल्ले करून ते उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. इराण आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ७ ऑक्टोबरपासून ७ ठिकाणांवर सातत्यानं हल्ला केला जात आहे. यात इराणमधून थेट हल्ल्यांचाही समावेश आहे. जगातील इतर देशांप्रमाणे इस्रायललासुद्धा उत्तर देण्याचा अधिकार आहे आणि ते कर्तव्यसुद्धा आहे. आम्ही इस्रायल आणि जनतेच्या संरक्षणासाठी जे आवश्यक असेल ते करू.
advertisement
IDFने एक फोटोसुद्धा शेअऱ केला आहे. त्यात जनरल स्टाफचे प्रमुख हर्जी हलेवी, इस्रायलच्या हवाई दलाचे कमांडिंग ऑफिसर जनरल तोमर बार यांच्यासोबत कँप रॉबिनमध्ये असलेल्या कमांड सेंटरमधून इराण हल्ल्याची सूत्रं सांभाळताना दिसत आहेत.
सीरियावरही हल्ले
सीरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटलं की, इस्रायलने मध्यरात्री २ वाजता दक्षिण आणि मध्य सीरियात काही ठिकाणी हल्ला केला. हे हल्ले तेव्हाच सुरू झाले जेव्हा इस्रायलने इराणवरही हल्ले केले. सीरियात काही इस्रायलच्या मिसाइल्सना पाडण्यात आल्याचा दावाही सीरियाने केला आहे.
इस्रायलच्या हल्ल्याची अमेरिकेला माहिती
इस्रायलकडून अमेरिकेलासुद्धा या हल्ल्याची माहिती देण्यात आलीय. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितलं की, इस्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्याची माहिती आम्हाला आहे आणि त्यावर आमचे लक्ष आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना इस्रायल-इराण युद्धाचे अपडेट दिले जात आहेत.
