ही धक्कादायक घटना बांग्लादेशमधील सतखीर जिल्ह्यातील शामनगर परिसरात घडली आहे. तिथे प्रसिद्ध असलेल्या जशोरेश्वरी मंदिरातील मुकूट चोरीला गेला आहे. द डेली स्टार रिपोर्टने दिलेल्या वृत्तानुसार हा मुकूट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 रोजी खास मुकूट या मंदिराला गिफ्ट म्हणून दिला होता. तोच मुकूट चोरीला गेल्यानं भीतीचं वातावरण आहे.
आधीच बांग्लादेशमध्ये स्थिती म्हणावी तेवढी फारशी चांगली नाही. दंगली होत असतानाच आता मंदिराच्या मुकुटाची चोरी झाल्याने हिंदूंमध्ये भीतीचं वातावरण आहे. तिथे पूजा करणाऱ्या गुरुजींना दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान मंदिरातून मुकुट चोरीला गेला. त्यावेळी मंदिराचे पुजारी दिलीप मुखर्जी दिवसभराची पूजा करुन घरी गेले होते. नंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की देवीच्या डोक्यातून मुकूट गायब आहे.
advertisement
श्यामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक तैजुल इस्लाम यांनी सांगितले की, चोराची ओळख पटविण्यासाठी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. चोरीला गेलेला मुकुट चांदीचा असून त्यावर सोन्याचा मुलामा चढवण्यात आला आहे. सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या ते खूप महत्त्वाचे आहे. हिंदू मान्यतेनुसार, जशोरेश्वरी मंदिर हे भारत आणि शेजारील देशांमध्ये पसरलेल्या 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. 'जशोरेश्वरी' या नावाचा अर्थ 'जशोरची देवी' असा होतो
27 मार्च 2021 रोजी पीएम मोदी बांग्लादेश दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी देवीला हा मुकूट परिधान केला होता. कोरोनानंतर त्यांनी पहिल्यांदाच परदेशातील दौरा हा बांग्लादेशचा त्यावेळी केला होता. त्यामुळे या दौऱ्याची चर्चाही झाली होती. पौराणिक कथेनुसार, 51 पीठांपैकी, ईश्वरपूरचे मंदिर हे ठिकाण आहे जेथे देवी सतीच्या पायाचे तळवे आणि तळवे पडले होते आणि ती देवी जशोरेश्वरीच्या रूपात येथे वास्तव्य करते असा समज आहे.
