TRENDING:

ज्योती मल्होत्राने हेरगिरीसाठी धर्म बदलला? पोलिसांचा मोठा खुलासा, डेटा स्कॅनिंगनंतर नवे भयानक प्रश्न उभे!

Last Updated:

पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्थेशी (ISI) संबंधांच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्रा प्रकरणाने नवा धक्का दिला आहे. तिच्या धर्म परिवर्तनाचे आणि लग्नाचे दावे निराधार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र अद्यापही अनेक गंभीर प्रश्न अनुत्तरित आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हिसार/ इस्लामाबाद: पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेसाठी (आयएसआय) हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्रा प्रकरणाभोवती दररोज नवनवीन प्रश्नचिन्हे उभी राहत असताना, हिसार पोलिसांनी या संदर्भात मोठा खुलासा केला आहे. ज्योतीने आपली ओळख लपवून धर्म परिवर्तन केले आणि मुस्लिम बनून एखाद्या पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न केले, असे सोशल मीडियावर सुरू असलेले दावे आणि अटकळी पूर्णपणे निराधार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
News18
News18
advertisement

निर्णायक पुरावे हाती नाहीत

हिसार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात ज्योतीचे धर्म परिवर्तन, लग्न किंवा कोणत्याही दहशतवादी नेटवर्कशी संबंध असल्याचे सिद्ध झालेले नाही. ज्योती सध्या हिसार पोलिसांच्या ताब्यात असून तिची पाच दिवसांची रिमांड आज संपत आहे. या काळात पोलिसांनी तिचा फोन, लॅपटॉप, बँक खाती आणि डिजिटल डेटाची कसून तपासणी केली. परंतु अद्याप कोणतेही निर्णायक पुरावे हाती लागले नाहीत. एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात ज्योतीच्या धर्म परिवर्तनाचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. तसेच एखाद्या पाकिस्तानी अधिकाऱ्याशी तिच्या लग्नासारखी कोणतीही बाब समोर आलेली नाही. ही पूर्णपणे चुकीची माहिती आणि अफवा आहे.

advertisement

फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा

ज्योती मल्होत्राच्या मोबाइल फोन, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणांमधील डेटा तपासला जात आहे. मात्र या उपकरणांमधून कोणतीही लष्करी माहिती, गोपनीय कागदपत्रे किंवा सामरिक माहिती लीक झाल्याचे स्पष्ट पुरावे मिळालेले नाहीत, असे हिसार पोलिसांनी सांगितले. फॉरेन्सिक लॅबमधून अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे आणि हे अहवालच आरोपीच्या हालचालींची व्याप्ती किती मोठी आहे, हे ठरवतील. व्हॉट्सॲप चॅटबद्दलही पोलिसांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ज्योतीच्या चॅट हिस्ट्रीमध्ये असे काही सुगावे असू शकतात. जे पुढील तपासाची दिशा ठरवतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

advertisement

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचे लक्ष आता ज्योतीच्या ऑनलाइन हालचाली, संपर्क आणि डिजिटल ट्रेसवर आहे. तिच्या सोशल मीडिया खाती, ईमेल कम्युनिकेशन आणि इन्स्टंट मेसेजिंग ॲप्सद्वारे तिने कधी, कुठे आणि कोणत्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेशी संपर्क साधला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्योतीच्या फोन आणि लॅपटॉपमधून असे कोणतेही डेटा मिळालेले नाहीत. ज्यामुळे ती देशाच्या लष्करी किंवा सामरिक माहितीपर्यंत पोहोचली होती हे सिद्ध होऊ शकेल, असे हिसार पोलिसांनी म्हटले आहे.

advertisement

चार बँक खात्यांची चौकशी सुरू

तपासात असे समोर आले आहे की, ज्योती मल्होत्राची चार वेगवेगळी बँक खाती आहेत, ज्यांच्या व्यवहाराच्या इतिहासाची कसून तपासणी केली जात आहे. तिला पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली आहे का, हे पोलीस जाणून घेऊ इच्छित आहेत. आतापर्यंतच्या माहितीनुसार, या खात्यांमधून कोणताही संशयास्पद व्यवहार आढळलेला नाही, परंतु व्यवहाराच्या मुळापर्यंत जाण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) आणि बँकिंग तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. तसेच डिजिटल वॉलेट, क्रिप्टोकरन्सी किंवा मनी ट्रान्सफर ॲप्सचा वापर झाला असण्याचीही शक्यता आहे. ज्याची चौकशी सध्या तांत्रिक एजन्सी करत आहेत.

advertisement

पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेशी संपर्क

हिसार पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, ज्योती पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्थेशी संपर्कात होती. परंतु तिने कोणत्याही दहशतवादी संघटनेत किंवा दहशतवादी कारवायांमध्ये थेट सहभाग घेतला नाही. पोलिसांनुसार ती भारतातील दहशतवादी कारस्थानांमध्ये सहभागी होती, असे दर्शवणारे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. धर्म परिवर्तन किंवा एखाद्या पाकिस्तानी अधिकाऱ्याशी विवाह यांसारख्या अटकळांना कोणताही आधार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात सध्या कोणतेही तथ्य समोर आलेले नाही.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

हिसार पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात असे काहीही मिळालेले नाही. ज्यामुळे असे म्हणता येईल की आरोपी ज्योतीने भारताच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित कोणतीही संवेदनशील किंवा सामरिक माहिती सामायिक केली आहे. तरीही तपास सुरू आहे आणि सर्व पैलू तपासले जात आहेत.

मराठी बातम्या/विदेश/
ज्योती मल्होत्राने हेरगिरीसाठी धर्म बदलला? पोलिसांचा मोठा खुलासा, डेटा स्कॅनिंगनंतर नवे भयानक प्रश्न उभे!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल