वादाची सुरुवात कशी झाली?
हे सगळं तेव्हा सुरू झालं, जेव्हा एलन मस्क यांनी ट्रम्प यांच्या 2024 च्या निवडणुकीसाठी मांडलेल्या खर्च व कर धोरणावर तीव्र टीका केली. मस्क यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ट्रम्प यांचा नविन खर्च विधेयक अमेरिकेवर आणखी कर्जाचा भार टाकेल. त्यावर ट्रम्प यांनी मस्कला "वेडा झालाय" म्हणत, संवाद तोडला.
advertisement
युक्रेनच्या राजधानीत हाहाकार, मेट्रो ट्रेन उडवली, पुतिनचा घातक गेम
विशेष म्हणजे मस्क यांनी ट्रम्प यांच्या निवडणुकीसाठी 300 दशलक्ष डॉलर (सुमारे 2500 कोटी) इतकं मोठं योगदान दिलं होतं. मात्र आता ते म्हणत आहेत की, ट्रम्प माझ्या पाठिंब्याशिवाय पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊच शकत नव्हते.
रशियाने खेळली चाल
यादरम्यान रशियाने संधी साधली. रशियन संसदेच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार समितीचे उपाध्यक्ष दिमित्री नोविकोव यांनी जाहीर केलं की, जर मस्क यांना राजकीय शरण हवं असेल, तर रशिया त्यासाठी तयार आहे. त्यांनी ही म्हटले की, मस्क वेगळाच खेळ खेळत आहेत, कदाचित त्यांना शरणाची गरजही नसेल.
त्याचवेळी रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी विनोदी शैलीत म्हटलं की, आवश्यकता भासल्यास आम्ही ट्रम्प आणि मस्क यांच्यात शांती चर्चा घडवून आणू.
क्रेमलिनची ‘मौन भूमिका’
रशियाच्या क्रेमलिनने मात्र या संपूर्ण वादावर स्पष्ट मौन बाळगलं आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी म्हटलं की, हा अमेरिकेचा अंतर्गत मुद्दा आहे. आम्हाला यात काहीही बोलायचं नाही.
बाजारात खळबळ
या संघर्षाचा थेट परिणाम शेअर बाजारांवर देखील जाणवला आहे. मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे मस्क यांनी अमेरिकेतील महत्त्वाच्या अंतराळ कार्यक्रमाला बंद करण्याचा इशारा देखील दिला आहे. मस्क यांनी DOGE या सरकारी खर्च नियंत्रक संस्थेच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणांना "अमेरिकेसाठी आर्थिक आत्महत्या" असं संबोधलं आहे.
आंतरराष्ट्रीय परिणाम
हा संघर्ष आता फक्त अमेरिकेपुरता मर्यादित न राहता रशिया सारख्या देशांची रसदर्शी भूमिका, आर्थिक उलथापालथ आणि राजकीय पडसादांमुळे एक जागतिक संघर्ष बनत चालला आहे. पुढे हे बघणं औत्सुक्याचं ठरेल की, हा संघर्ष समंजस्याकडे वळतो की आणखी भडकतो.